आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवराची खेळातील जादू पुन्हा सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगरूळू - टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराजने राखी पोर्णिमा एका खास अंदाजात साजरी केली. आपला मुलगा तंदुरूस्त होत आहे यापेक्षा मोठी भेट घरच्यांसाठी काय असू शकते. अशीच अनोखी भेट युवराजने त्याच्या कुटूंबीयांना आणि लाखो चाहत्यांना दिली आहे एका मैत्रिपूर्ण लढतीत भाग घेवून त्याने आपल्या फलंदाजीची जादू पुन्हा एकदा दर्शकांना दाखवली.
अंडर-19 संघाच्या विरूध्द केएससीए-11 संघाकडून खेळतांना युवराजने 47 धावांची खेळी खेळली. युवराजने ट्विटरवर लिहले की, आठ महिन्याच्या दिर्घ काळानंतर सराव सामन्यात 70 चेडूत 47 धावा पाच ओव्हर आणि 30 ओव्हरपर्य़त फिल्डिंग देखील केल्याचे त्याने स्पष्ट केले. सराव सामन्यादरम्यान सहभागी होऊन त्याने आपण फिट आहोत की नाही हे देखील तपासले. मागील आठ महिन्यांपासून युवराज कॅन्सरच्या उपाचांमुळॆ क्रिकेटपासून दूर होता. जानेवारीमध्ये अमेरिकेत त्याने केमोथेरेपीचे उपाचार घेतले होते.
युवीचे नाव सप्टेंबरमध्ये होणार्‍या टी-20 वर्ल्ड कपच्या संभवित 30 खेळाडूंच्या यादीत सामाविष्ट करण्यात आले आहे. युवराजने त्याचा अंतिम सामना 2 एप्रिल 2011 मध्ये विश्वकपमध्ये खेळला होता.