आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10th Indian T20 League Team A Possibility: Shukla

आयपीएलमध्ये लवकरच दहावा संघ : शुक्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर - पैशांचा पाऊस पाडणारी स्पर्धा अर्थात इंडियन प्रीमियर लीगमध्ये दहाव्या संघाचा समावेश लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या सहाव्या आयपीएल स्पर्धेनंतर दहाव्या फ्रँचाईजी टीमबाबत प्रक्रियेला सुरुवात होईल. आयपीएल स्पर्धेनंतर यावर चर्चा आणि कारवाई केली जाईल, शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या फॉरमॅटमध्ये कसलाही बदल केला जाणार नाही. यापुढे एका संघात अंतिम अकरा खेळाडूंत फक्त चार विदेशी खेळाडूंना संधी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.