आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Th Asian Games News In Marathi, Divya Marathi, South Korea

आशियाई क्रीडा स्पर्धा आजपासून, १६ दिवस चालणार क्रीडा महोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शुक्रवारी रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात होईल. १६ दिवस चालणा-या या स्पर्धेत ४५ देशांचे १० हजारांपेक्षा अधिक खेळाडू आपले आव्हान सादर करतील. जगात एक क्रीडाशक्ती म्हणून उदयास आलेला चीन या वेळीसुद्धा सर्वाधिक पदके जिंकण्याच्या लक्ष्याने मैदानावर उतरेल. चीनला यजमान दक्षिण कोरिया आणि जपानचे आव्हान असेल. भारतसुद्धा या वेळी ७५ पदकांच्या आशेने मैदानावर लढणार आहे.

दक्षिण कोरियात तिस-यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहेत. यापूर्वी द. कोरियाने १९८६ मध्ये सोल येथे, तर २००२ मध्ये बुसान येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते.
चीनचे सर्वात मोठे पथक : या स्पर्धेत चीन ८९४ सदस्यांसह सर्वांत मोठे पथक उतरवणार आहे. यजमान कोिरया ८३३ खेळाडूंसह आव्हान सादर करेल. जपानचे ७१८ सदस्यीय, तर भारताचे ५१६ खेळाडूंसह एकूण ६७९ सदस्यीय पथक असेल. भारतीय खेळाडू २८ क्रीडा प्रकारांत सहभागी होतील. भारताने मागच्या वेळी ६६२ खेळाडू पाठवले होते. मागच्या वेळी भारताने ३५ खेळांत सहभाग घेतला होता. थायलंडचे ५१८ सदस्यीय, हाँगकाँगचे ४७६ सदस्यीय, चीन तैपेईचे ४२० सदस्यीय आणि कजाकिस्तानचे ४१५ सदस्यीय पथक आहे.

ब्रुनेईचे सर्वात छोटे पथक : या स्पर्धेत सर्वात छोटे पथक ब्रुनेईचे असेल. ब्रुनेईचे फक्त ११ सदस्यीय पथक आहे. द. कोरियाचे शेजारी राष्ट्र उत्तर कोिरया १५० सदस्यीय पथकासह स्पर्धेत खेळेल.
टॉप-५ मध्ये येण्याचे भारताचे लक्ष्य : या वेळी १५ सुवर्णपदके मिळवून अव्वल पाच देशांत स्थान मिळवण्याचे लक्ष्य भारताचे असेल. भारताला या वेळी नेमबाजी, कबड्डी, बॉिक्संग, कुस्ती, स्क्वॅश, टेिनस, वुशू, अॅथलेिटक्स, तिरंदाजी, बॅडमिंटन, गोल्फ, रोइंगमध्ये पदकाची आशा आहे. भारताने मागच्या आिशयाई स्पर्धेत १४ सुवर्णंासह ६५ पदके िजंकली होती. मात्र, टॉप-५ मध्ये स्थान मिळाले नव्हते. भारत सहाव्या स्थानी होता.

अिभनव िबंद्राच्या मदतीला एकही अिधकारी नाही !
इंचियोन येथे दाखल झालेला ऑलिम्पिक चॅिम्पयन नेमबाज अभिनव िबंद्राच्या मदतीसाठी िवमानतळावर एकही भारतीय अिधकारी उपस्थित नव्हता. सर्व औपचारिकता पूर्ण करून क्रीडाग्रामपर्यंत पोहोचण्यासाठी िबंद्राला तब्बल चार तास लागले. अखेर स्थािनक अिधका-यांनी भारतीय अिधका-यांना संपर्क केल्यानंतर िबंद्राला क्रीडाग्राममध्ये प्रवेश िमळाला. िबंद्रा तसा शांत स्वभावाचा आहे. मात्र, या अडचणींमुळे तो जाम वैतागला.
पुढे वाचा चीनपुढे आहे कोरियाचेच आव्हान...