आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 18 Year Old Young Cricketer Won Heart Of Shilpa Shetty

PHOTOS: नव-यासमोरच 18 वर्षांच्‍या पोरावर शिल्‍पा झाली फिदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्‍पा शेट्टीच्‍या राजस्‍थान रॉयल्‍सने जयपूरमध्‍ये घरच्‍या मैदानावर पंजाबला धूळ चारली. या सामन्‍यापूर्वी राजस्‍थानच्‍या संघासमोर दुखापतींचे संकट होते. परंतु, राजस्‍थानने विजय मिळवला. हा सामना चुरशीचा झाला. एकावेळी राजस्‍थान रॉयल्‍सचा डाव अडचणीत आला होता. त्‍यावेळी शिल्‍पाचा चेहरा कोमेजला होता. परंतु, एका 18 वर्षाच्‍या तरुण फलंदाजाने जिगरबाज खेळी करुन तिच्‍या चेह-यावर हास्‍य फुलविले.

कोण आहे हा 18 वर्षांचा पोरगा ज्‍याने शिल्‍पाच्‍या चेह-यावर फुलवले हास्‍य, जाणून घ्‍या पुढच्‍या फोटोंमध्‍ये...

या खेळाडूचे नाव आहे संजू सॅमसन. नियमित विकेटकिपर दिशांत याग्निक जायबंदी झाल्‍यामुळे द्रविडसमोर दुसरा पर्याय नव्‍हता. केरळकडून खेळणारा संजू यापुर्वीच्‍या आयपीएल हंगामात कोलकाना नाईट रायडर्सच्‍या संघात होता. परंतु, त्‍याला एकही सामना खेळण्‍याची संधी मिळाली नाही.

राजस्‍थानकडून मिळालेली पहिली संधी संजूने गमावली नाही. त्‍याने 3 झेल घेतले. त्‍यापैकी आर. सतीशचा झेल तर अप्रतिम होता. परंतु, खरी कमाल त्‍याने फलंदाजीत दाखवली. राजस्‍थानचा डाव अडचणीत आला होता. 125 धावांचा पाठलाग करताना 79 धावांमध्‍ये 4 फलंदाज बाद झाले होते. त्‍यावेळी राजस्‍थानवर प्रचंड दडपण आले होते. अशा स्थितीत संजूने 23 चेंडुंमध्‍ये 27 धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. विजयी फटका मारताच शिल्‍पा शेट्टी जाम खुष झाली.