आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 19 Under Tri Series : Youth India Won Through Vijay Zol Century

19 वर्षाखालील तिरंगी मालिका : विजय झोलचा शतकी दणका; युवा इंडिया विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डरविन - कर्णधार विजय झोलचा (128) शतकी दणका आणि सलामीवीर अखिल हेरवाडकरच्या (55) अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर युवा इंडियाने न्यूझीलंडवर 165 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील खेळाडूंच्या तिरंगी मालिकेत भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. यापूर्वी पहिल्या लढतीत भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला हरवले होते. न्यूझीलंडविरुद्ध भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 276 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 42 षटकांत अवघ्या 111 धावांत गुंडाळले.


पुन्हा कुलदीप चमकला
प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून सहाव्या क्रमांकाचा फलंदाज मॅक्युलरने सर्वाधिक 41 धावा काढल्या. कोलरने 10, तर जेमीसनने 23 धावा काढल्या. आली नाही. भारताकडून डावखुरा गोलंदाज कुलदीप यादवने 22 धावांत 3 गडी बाद केले. सी. मिलिंद आणि लांबा यांनी प्रत्येकी 2 विकेट टिपल्या.


झोलची तडफदार फलंदाजी
एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने विजयने शतक ठोकले. विजयने 131 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 16 चौकार खेचत 128 धावा काढल्या. यातील 70 धावा तर त्याने चौकार आणि षटकाराच्या मदतीने काढल्या. झोलने 97.70 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.


संघ खूपच उत्साही
या संघातील बहुतांश खेळाडू नवीन आहेत, त्यांच्यापैकी अनेकांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मात्र ते खूपच उत्साही आहेत. कर्णधार म्हणून टीमवर्कच्या माध्यमातून आणखी चांगला खेळ करायचा आहे. आजच्या विजयानंतर आता पुढच्या तयारीला लागलो आहोत.
विजय झोल, कर्णधार


संक्षिप्त धावफलक
भारत : 276 (विजय झोल 128, हिरवाडकर 55, एस. खान 30, 2/32 वॉटसन), न्यूझीलंड : 111 (मॅक्लुलर 41, 3/22 कुलदीप, 2/16 मिलिंद, 2/21 लांबा)