आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 1983 Cricket World Cup Worst Record In Match Vs India, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECALL- वर्ल्डकपमधील सगळ्यात वाईट रेकॉर्ड, जो मोडायला लागले 16 वर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
31 वर्षांपूर्वी 25 जूनला टीम इंडियाने पहिल्यांदा क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. लॉर्ड्समध्ये सलग दोनदा विजेत्या ठरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाचा कपिल देव आणि कंपनीने धुव्वा उडवला होता. याचवेळी वर्ल्डकपच्या इतिहासात सगळ्यात वाईट रेकॉर्ड तयार झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा रेकॉर्ड केला होता, जो मोडायला 16 वर्षे लागली.
कोणत्या सामन्याचा बनला रेकॉर्ड
वन-डे क्रिकेटमध्ये नो बॉल ही एखाद्या गोलंदाजाकडून झालेली सगळ्यात मोठी चूक असते. 20 जून 1983ला चेल्म्सफोर्ड येथे भारताविरूद्ध झालेल्या ग्रुप-बी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 15 नो बॉल टाकले होते.
त्या सामन्यात जवागल श्रीनाथ आणि अजित आगरकर यांनी 5-5, सौरव गांगुलीने 3, वेंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 1-1 नो बॉल टाकले होते.
आयसीसी वर्ल्डकपमध्ये या संघांनी टाकले सर्वाधिक नो बॉल
भारत- 16 - झिम्बाब्वेविरूद्ध (19 मे 1999)
स्कॉटलंड- 15- पाकिस्तान विरूद्ध (20 मे 1999)
ऑस्ट्रेलिया- 15- भारताविरूद्ध (20 जून 1983)
बर्म्युडा-14- दक्षिण अफ्रिकेविरूद्ध (5 जून 1999)
वेस्ट इंडीज- 13- केनियाविरूद्ध(29 फेब्रुवारी)
(फोटोओळ- लॉर्ड्सच्या बाल्कनीत वर्ल्डकप ट्रॉफीच्या ट्रॉफीसोबत विनिंग पोझमध्ये कर्णधार कपिल देव)
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारताशी संबंधित काही रोमांचक आकडेवारी