आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑकलंड- न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत शानदार मुसंडी मारल्यानंतरसुद्धा टीम इंडियाचा पराभव झाला. पहिल्या डावात 301 धावांनी मागे पडलेल्या धोनी ब्रिगेडने यजमान न्यूझीलंडला दुसर्या डावात 105 धावांत गुंडाळले होते. नंतर शिखर धवनच्या (115) शतकाच्या बळावर भारताने 366 धावा काढल्या. मात्र, टीम इंडिया 407 धावांच्या लक्ष्यापासून अवघ्या 40 धावांनी दूर राहिली.
द्विशतक ठोकणारा किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्लुम (224) ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसर्या कसोटीला 14 फेब्रुवारीपासून वेलिंग्टन येथे सुरुवात होईल.
पहिला कसोटी सामना अत्यंत रोमांचक ठरला. सामना बर्याच वेळा दोन्ही बाजूंनी वळला. मात्र, अखेर सुरुवातीचे दोन दिवस मैदान गाजवणार्या किवी संघाने सामना जिंकला. भारताने धावांचा पाठलाग करताना शनिवारी एक बाद 87 धावा काढल्या होत्या. चौथ्या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भरवशाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा कालच्या स्कोअरमध्ये अवघी एक धाव जोडून 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे, जहीर खान, रवींद्र जडेजा अपयशी ठरले.
धवन-कोहलीची भागीदारी
भारताला दबावातून बाहेर काढताना धवन व विराट कोहलीने विजयाच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनी 126 धावांची भागीदारी केली. मात्र, 222 च्या स्कोअरवर कोहली बाद होताच सामन्याचे चित्र बदलले. नंतर भारताने फटाफट विकेट गमावल्या. धोनी (39) आणि रवींद्र जडेजा (26) यांनी सातव्या विकेटसाठी 5.4 षटकांत 54 धावा जोडल्या.
क्रमवारी : दुसरे स्थान संकटात
पराभवामुळे भारताचे क्रमवारीतील दुसरे स्थान संकटात सापडले आहे. भारताला दुसरे स्थान कायम ठेवायचे असेल तर दुसरा कसोटी सामना जिंकावाच लागेल. सामना ड्रॉ झाला अथवा भारताचा पराभव झाल्यास टीम इंडिया तिसर्या क्रमांकावर घसरेल. सध्या दक्षिण आफ्रिका नंबर वन तर न्यूझीलंड आठव्या क्रमांकावर आहे.
हेही महत्त्वाचे
>मागच्या 11 कसोटींत विदेशात खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताचा दहावा पराभव ठरला.
>धोनीच्या नेतृत्वाखाली विदेशी भूमीवर भारताचा अकरावा पराभव ठरला. विदेशातील पराभवाच्या हिशेबाने तो आता सर्वाधिक अपयशी भारतीय कर्णधार ठरला आहे.
>मागच्या तीन कसोटींत किवी गोलंदाजांनी 59 विकेट घेतल्या आहेत.
>ऑ कलंड येथे भारताचा पराभव. येथे यापूर्वी झालेल्या चार कसोटींपैकी दोनमध्ये विजय.
धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव 503. भारत पहिला डाव 202. न्यूझीलंड दुसरा डाव 105.
भारत दुसरा डाव धावा चेंडू 4 6
विजय झे. वॉटलिंग गो. साउथी 13 21 2 0
धवन झे. वॉटलिंग गो. वॅग्नर 115 211 12 1
पुजारा झे. वॉटलिंग गो. साउथी 23 71 1 1
कोहली झे. वॉटलिंग गो. वॅग्नर 67 102 12 0
रोहित झे. वॉटलिंग गो. साउथी 19 59 2 0
रहाणे पायचीत गो. बोल्ट 18 21 3 0
धोनी त्रि. गो. वॅग्नर 39 41 6 0
जडेजा झे.सोढी गो. बोल्ट 26 21 4 1
जहीर झे. टेलर गो. वॅग्नर 17 32 1 1
ईशांत झे. वॉटलिंग गो. बोल्ट 04 04 1 0
मो. शमी नाबाद 0 0 0 0
अवांतर : 25. एकूण : 96.3 षटकांत सर्वबाद 366 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-36, 2-96, 3-222, 4-248, 5-268, 6-270, 7-324, 8-349, 9-362, 10-366. गोलंदाजी : बोल्ट 23.3-2-86-3, साउथी 23-4-81-3, वॅग्नर 25-8-62-4, अँडरसन 7-1-22-0, सोढी 15-2-78-0, विलियसन 3-0-18-0.
पुढे वाचा, वॅग्नरचे चार बळी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.