आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 279 Sportspersons Flunked Dope Test In 2yrs: Sports Min

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेल्या दोन वर्षांत 279 खेळाडू डोप चाचणीत दोषी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीतर्फे (नाडा) गत दोन वर्षांत करण्यात आलेल्या अमली पदार्थ चाचणीत (डोप टेस्ट) एकूण 279 खेळाडू दोषी ठरले आहेत. त्यात प्रामुख्याने वेटलिफ्टर्सची संख्या अधिक आहे.

लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना जितेंद्रसिंग बोलत होते. या वेळी बोलताना जितेंद्रसिंग यांनी सांगितले की केंद्र सरकार आणि नाडाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम चालवली जात आहे. त्याअंतर्गत गत तीन वर्षांत 9898 खेळाडूंची अमली पदार्थ चाचणी घेण्यात आली. खेळातून अमली पदार्थांच्या सेवनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या या चाचण्यांमधून 279 खेळाडू दोषी आढळले असल्याचे त्यांनी नमूद केले. अमली पदार्थ सेवन करणार्‍यांविरोधात नाडाने कठोर उपाययोजना करण्यात येत असल्याचेही जितेंद्रसिंग यांनी नमूद केले.

नाडाची विशेष मोहीम
03वर्षे घेण्यात आल्या चाचण्या
279खेळाडू सापडले दोषी
9898खेळाडूंची झाली चाचणी

0डोपिंग प्रकरणातील दोषी खेळाडूंवर आठ ते दहा वर्षांच्या बंदीची कारवाई केली जाणार आहे.
0 वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्तीसारख्या खेळात दोषी खेळाडूंचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले.

नाडाने शिबिरातून कर्मचार्‍यांना दिले प्रशिक्षण
2009 ते 2012 या तीन वर्षांत नाडाने सर्व प्रकारच्या खेळांतील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहायक कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्यासाठी अनेक शिबिरे घेतली. त्या शिबिरांमध्ये त्यांनी अमली पदार्थांबाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच काय करावे, काय टाळावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याशिवाय अमली पदार्थ सेवन रोखण्याबाबतच्या उपाययोजनांचीही माहिती देण्यात आल्याचे जितेंद्रसिंग यांनी सांगितले. विविध खेळांतील अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचण्यासाठी नाडाने सीबीएसई आणि स्कूल गेम्स फेडरेशनच्या राज्य आणि राष्ट्रीय संघटनांशी समन्वय राखत आहे. यामुळे कोणत्याही खेळाची प्रतिमा मलिन होऊन नये, यासाठी प्रयत्न करत असल्याचे जितेंद्रसिंग यांनी नमूद केले.