आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावडी रायडू ! दुस-या वनडेत टीम इंडियाची श्रीलंकेवर ६ गड्यांनी सहज मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - शिखर धवनचे (७९) अर्धशतक आणि युवा फलंदाज सामनावीर अंबाती रायडूच्या (नाबाद १२१) तडाखेबंद शतकाच्या बळावर टीम इंडियाने गुरुवारी मालिकेतील दुस-या वनडेतही श्रीलंकेला ६ गड्यांनी पराभूत केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने कर्णधार मॅथ्यूजच्या नाबाद ९२ धावांच्या खेळीच्या बळावर ८ बाद २७४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ४४.३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात गाठले.

धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मागच्या सामन्यातील शतकवीर अजिंक्य रहाणे या वेळी केवळ ८ धावा काढून बाद झाला. यानंतर शिखर धवनने दुस-या विकेटसाठी अंबाती रायडूसोबत १२२ धावांची शतकी भागीदारी केली. धवन ७९ धावा काढून बाद झाला. त्याने ८० चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि १ षटकार मारला. कर्णधार कोहलीने ४९ धावा काढल्या. त्याने ४४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारले. रैनाने १४, तर जडेजाने नाबाद १ धाव काढली.

तत्पूर्वी, श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुशल परेराला शून्यावरच उमेश यादवने पायचीत केले. यानंतर तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा यांनी दुस-या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. दिलशान ३५ धावा काढून बाद झाला. दिलशानने ३० चेंडूंचा सामना करताना ७ चौकार मारले. माजी कर्णधार महेला जयवर्धने ४ धावा काढून ऑफस्पिनर अश्विनचा बळी ठरला.

मॅथ्यूज, संगाची चमक
मॅथ्यूजने धम्मिका प्रसादसोबत नवव्या गड्यासाठी अवघ्या ६.४ षटकांत ५४ धावांची अभेद्य भागीदारी केली. धम्मिका प्रसादने नाबाद ३० धावा काढल्या. या दोघांच्या भागीदारीच्या बळावर श्रीलंकेने ८ बाद २२० वरून २७४ धावांपर्यंत मजल गाठली. मॅथ्यूजने १०१ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि १ षटकार मारला. याशिवाय श्रीलंकेकडून माजी कर्णधार कुमार संगकाराने ६१ धावा काढल्या. त्याने ८६ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार मारले. प्रसादने तळाला फलंदाजी करताना २८ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ३० धावा काढल्या.


रायडूचे दमदार शतक
१२१ धावा
११८ चेंडू
१० चौकार
०४ षटकार
भारताकडून अंबाती रायडूने दमदार फलंदाजी केली. त्याने ११८ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि १० चौकार मारले. त्याने नाबाद १२१ धावा काढल्या. रायडूने सामन्यात दोन शतकी भागीदा-या केल्या. सुरुवातीला त्याने शिखर धवनसोबत दुस-या विकेटसाठी १२२ धावांची तर नंतर कर्णधार कोहलीसोबत ११६ धावांची, भागीदारी करून सामना श्रीलंकेच्या हातून खेचला. रायडूने अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करीत प्रेक्षकांची मने जिंकली.
धावफलक
श्रीलंका धावा चेंडू ४ ६
के.परेरा पायचीत गो. यादव ०० ०६ ० ०
दिलशान त्रि.गो. अक्षर ३५ ३० ७ ०
संगकारा झे. धवन गो. यादव ६१ ८६ ४ ०
जयवर्धने झे. रायडू गो. अश्विन ०४ ११ ० ०
अँजेलो मॅथ्यूज नाबाद ९२ १०१ १० १
प्रसन्ना झे. रायडू गो.जडेजा १३ १४ १ १
प्रियंजन धावबाद ०१ ०२ ० ०
टी.परेरा त्रि.गो. अक्षर १० ११ ० १
सूरज रणदीव त्रि.गो. अश्विन १० १३ १ ०
धम्मिका प्रसाद नाबाद ३० २८ ४ ०
अवांतर : १८. एकूण : ५० षटकांत ८ बाद २७४ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-४, २-५५, ३-६४, ४-१५४, ५-१७७, ६-१७९, ७-२०५, ८-२२०. गोलंदाजी : उमेश यादव १०-१-५४-२, ईशांत शर्मा १०-०-५८-०, आर. अश्विन १०-१-४९-२, अक्षर पटेल १०-१-३९-२, रवींद्र जडेजा १०-०-६४-१.
भारत धावा चेंडू ४ ६
रहाणे झे. महेला गो. प्रसाद ०८ १९ १ ०
धवन झे. प्रियंजन गो. प्रसन्ना ७९ ८० ७ १
अंबाती रायडू नाबाद १२१ ११८ १० ४
कोहली झे. रणदीव गो. प्रसन्ना ४९ ४४ २ २
रैना पायचीत गो. प्रसन्ना १४ ६ १ १
रवींद्र जडेजा नाबाद १ १ ० ०
अवांतर : ०३. एकूण : ४४.३ षटकांत ४ बाद २७५ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१८, २-१४०, ३-२५६, ४-२७०. गोलंदाजी : मॅथ्यूज ४-०-१८-०, गमागे ८-१-२८-०, प्रसाद ७-०-५१-१, परेरा ४-०-३५-०, रणदीव १०-०-६६-०, दिलशान २-०-९-०, प्रसन्ना ७.३-०-५३-३, प्रियंजन २-०-१४-०.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍याची छायाचित्रे...