भोपाळ - 'मुर्ती लहान पण कीर्ती महान' अशी आपल्याकडे म्हण आहे. आपण जेव्हा वेदांतची फलंदाजी पाहाल तेव्हा या म्हणीचा प्रत्यय आपल्याला येईल.
चौकारांचा अनोखा जादुगार
केवळ 3 फुट उंची असलेला वेदांत जेव्हा मैदानाव क्रिकेट खेळतो तेव्हा भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटतो. वेदांत अफलातून चौकार मारतो. त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले की, वेदात फिरकी तसेच स्पीन गोलंदाजांना उत्तमरित्या सामोरा जातो. सोबतच अप्रतिम विकेटकीपरींगसुध्दा करतो.
वेदांतच्या संघातील सर्व खेळाडूंची उंची पाच फुटाहून अधिक आहे. उंचीविषयी त्याला विचारणा करताच तो म्हणतो, ''उंचीमुळे काय होते?
सचिन तेंडूलकरची सुध्दा उंची कमी आहे.'' मला क्रिकेटची आवड आहे. वेदांत सध्या पाचवीमध्ये शिकत असून त्याला चित्रकलेचीही आवड आहे.
व्याधीमूळे नाही वाढत उंची
वेदांतला एकोन्ड्रोप्लाजिया नावाचा आजार आहे. त्यामूळे त्याची उंची वाढत नाही. डॉ. शंकर पाटीदार यांनी सांगितले आहे की, एकोन्ड्रोप्लाजिया या आजारामुळे शरीरातील हाडांचा विकास होत नाही. त्यामुळे शरीराची उंची वाढत नाही.
पुढील स्लाइडवर पाहा, छायाचित्रे..