आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी 20 चे त्रिशतक, टीम इंडियाने खेळले सर्वात कमी सामने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सुमारे आठ वर्षांपूर्वी म्‍हणजे 17 फेब्रुवारी 2005 रोजी ऑकलंडमधून सुरू झालेला आंतरराष्‍ट्रीय टी-20 सामन्‍यांचा प्रवास आज (सोमवार) 300 सामन्‍यांपर्यंत येऊन पोहचला.

ऑस्‍ट्रेलिया आणि श्रीलंका दरम्‍यान मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळण्‍यात आलेल्‍या दुस-या टी- 20ने 300 आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यांचा टप्‍पा गाठला. पहिला टी- 20 सामना ऑस्‍ट्रेलिया आणि न्‍यूझीलंड यांच्‍यात खेळला गेला होता.

उल्‍लेखनीय म्‍हणजे इंडियन प्रीमिअर लीग सारख्‍या यशस्‍वी टी- 20 टुर्नामेंटचे आयोजन करणा-या भारताने कसोटी खेळणा-या अन्‍य देशांपेक्षा सर्वात कमी टी-20 आंतरराष्‍ट्रीय सामने खेळले आहेत. भारताच्‍या खात्‍यात अवघ्‍या 45 सामन्‍यांची नोंद आहे.

पाकिस्‍तानने सर्वाधिक 66 टी- 20 सामने खेळले असून न्‍यूझीलंड (62), ऑस्‍ट्रेलिया (60), दक्षिण आफ्रिका (55), श्रीलंका (51), वेस्‍ट इंडिज (46) आणि त्‍यानंतर टीम इंडियाचा क्रमांक लागतो.

श्रीलंका आणि वेस्‍ट इंडिज यांच्‍यादरम्‍यान 100 वा टी- 20 सामना दहा जून 2009 रोजी नॉटिंगममध्‍ये खेळला गेला होता. श्रीलंकेने हा सामना 15 धावांनी जिंकला होता. त्‍यानंतर दोन वर्षांनी म्‍हणजे चार जून 2011 रोजी भारत आणि वेस्‍ट इंडिज यांच्‍यादरम्‍यान पोर्ट ऑफ स्‍पेन येथे 200 वा सामना खेळण्‍यात आला होता. या सामन्‍यात टीम इंडियाने 16 धावांनी विंडीजवर मात केली होती.