आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५ वी राष्ट्रीय स्पर्धा : सिद्धांतला सुवर्ण, थाेम्बसिंगची ‘चांदी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: कर्नाटक अाणि तामिळनाडूच्या महिला संघात रंगलेला व्हाॅलीबाॅलचा उपांत्य सामना.
तिरुवनंतपुरम - महाराष्ट्र संघाने ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेतील आपली सोनेरी कामगिरीची लय कायम ठेवली. सिद्धांत थिगुलिया आणि थोम्बसिंग लैशरामने गुरुवारी महाराष्ट्राला पदके मिळवून दिली. यासह महाराष्ट्र संघाने स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला.
स्पर्धेतील पुरुष गटाच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राचा सिद्धांत थिगुलिया चॅम्पियन ठरला. त्याने १३.८३ सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. यासह सिद्धांतने महाराष्ट्राचे अॅथलेटिकमधील वर्चस्व कायम ठेवले. या गटात तामिळनाडूचा सुरेंदर कुमार रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने १३.९८ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. तसेच तेलंगणच्या प्रेमकुमारने कांस्यपदकावर नाव कोरले.

तलवारबाजी : थोम्बसिंगला रौप्य
महाराष्ट्राच्या थोम्बसिंग लैशरामने गुरुवारी तलवारबाजीत रौप्यपदकावर नाव कोरले. त्याने पुरुषांच्या फाॅइल प्रकारात हे यश संपादन केले. एसएससीबीच्या विनोद कुमारने अंतिम फेरीत १७३-१०६ ने बाजी मारून सुवर्णपदक जिंकले. थोम्बसिंगला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले.

हँडबॉल : महाराष्ट्र महिला पराभूत
महाराष्ट्राच्या महिला हँडबॉल संघाला गुरुवारी उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबने रंगतदार लढतीत ४१-३३ अशा फरकाने महाराष्ट्राचा धुव्वा उडवला. निशाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या महिला हँडबाॅल संघाने विजयासाठी झुंज दिली.

११० मी. अडथळा शर्यत
पदक खेळाडू
सुवर्ण सिद्धांत थिगुलिया (१३.८३ से.)
राैप्य सुरेंदर जयकुमार (१३.९८ से.)
कांस्य के. प्रेमकुमार (१४.२० से.)

कर्नाटक ३-२ ने विजयी
गुरुवारी व्हॉलीबॉलच्या महिला गटात कर्नाटक संघाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. या संघाने उपांत्य लढतीत तामिळनाडू महिला संघाला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. कर्नाटकने पहिल्या सेटमध्ये २८-२६ अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर तामिळनाडूनेही तोडीसतोड खेळी करून दुसरा सेट २५-२१ ने आपल्या नावे करून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही सेट जिंकून कर्नाटकने सामना आपल्या नावे केला.