आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 35th National Games Hruthika Shriram New Mark In The Women’s High Board Diving

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऋतिकाचा सुवर्ण विक्रम, पाच सुवर्णांसह दीपा ठरली गोल्डन गर्ल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - तिरुवनंतपुरम येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरणातील डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या ऋतिका पार्वतय्या श्रीराम हिने विक्रमासह तीन सुवर्णपदके पटकावत हॅट्ट्रिक केली आहे. हायबोर्ड व तीन मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये तिने ही कामगिरी याअगोदरच केली होती. शुक्रवारी तिने एक मीटर स्प्रिंगबोर्डमध्येही विक्रमासह सुवर्ण पटकावले. परंतु तिला बारावीत शिकत असलेल्या मुंबईच्याच सिमरन जानीने चांगलेच झुंजवले. रौप्य मिळवलेल्या सिमरनची लढत कौतुकास्पद आहे. दोघीत ०.२० गुण इतकाच फरक होता. ऋतिकाने १८७.३५, तर सिमरनने १८७.२० गुण मिळवले.

ऋतिकाने याअगोदरचा तिच्याच नावावर असलेला विक्रम मोडीत नवीन विक्रम प्रस्थापित केला. हायबोर्डपेक्षा स्प्रिंगबोर्डमध्ये सुवर्ण मिळवण्यासाठी चुरस होती. स्पर्धेत विक्रमासह मला मिळालेली हॅट्ट्रिक ही माझ्या वाढदिवसाची खर्‍या अर्थाने भेट आहे, अशी प्रतिक्रिया ऋतिकाने दिली.

बंगालचा दोन खेळाडूंना विरोध!
बंगाल संघाने आपल्याच राज्यातील दोन खेळाडूंना मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करण्यास विरोध केला. हे खेळाडू पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यास आहेत.

महाराष्ट्राची तामिळनाडूवर मात
महाराष्ट्र पुरुष फुटबॉल संघाने विजयाची नोंद केली. या संघाने तामिळनाडूवर २-१ ने मात केली. अलीने (२३, ८० मि.) महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.

वंदिताला कांस्य
महाराष्ट्राची युवा खेळाडू वंदिता रेड्डी चमकली. तिने स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले. वंदिताने बॅलेन्स बीम प्रकारात तिसरे स्थान पटकावले. उल्लेखनीय कामगिरी करणारी युवा खेळाडू कांस्यपदकाची मानकरी ठरली.

पाच सुवर्णांसह दीपा ठरली गोल्डन गर्ल
राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन दीपा कर्माकरने राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदकांची कमाई केली. यासह तिने पाचव्या दिवशी शुक्रवारी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्ट होती. हीच लय तिने राष्ट्रीय स्पर्धेतही कायम ठेवली.

त्रिपुराचे प्रतिनिधित्व करणार्‍या दीपाने बॅलेन्स बीम, फ्लोअर एक्झरसाइझ, टेबल वॉल्ट, युनेव्हने बार आणि डब्ल्यूएजी वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदकांची कमाई केली. याच गटात मध्य प्रदेशची प्रांती नायक चमकली. तिने टेबल वॉल्ट आणि बार या दोन्ही प्रकारांत रौप्यपदक पटकावले. तसेच बॅलेन्स बीममध्ये पश्चिम बंगालच्या मंदिरा चौधरीने रौप्यपदकावर नाव कोरले. तिनेही शानदार कामगिरी करून पदकावर नाव कोरले.
(फोटो : राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेल्या पाच सुवर्णपदकांसह त्रिपुराची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर.)