आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3rd Unofficial Test: Zaheer, Pujara Help India A Win By An Innings And 54 Runs

झॅक इज बॅक : भारत-विंडीज चारदिवसीय सामना, भारताचा एक डाव 54 धावांनी विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुबळी - जहीर खानच्या (59/4 ) भेदक गोलंदाजीच्या बळावर भारत अ संघाने शनिवारी तिसर्‍या चारदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज अ संघाला एक डाव आणि 54 धावांनी पराभूत केले. पहिल्या डावात विंडीजने 268 धावा केल्या. भारताने कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या त्रिशतकाच्या बळावर 564 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 296 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात विंडीजचा दुसरा डाव 73.5 षटकांत सर्वबाद 242 धावांत संपुष्टात आला. यासह ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली.
वेस्ट इंडीजने कालच्या 3 बाद 100 धावांच्या पुढे खेळताना चौथ्या दिवशी संघाचा डाव 142 धावांत आटोपला. नरसिंगने 180 चेंडंूत 99 धावा काढल्या. फुदादिन 49, कर्टर 12, मिलर 17 धावा काढून बाद झाले. गोलंदाजीत नायरने 2 गडी टिपले.
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडीज : पहिला डाव 268 धावा. भारत पहिला डाव 564 धावा. वेस्ट इंडीज दुसरा डाव सर्वबाद 242 धावा. ( नरसिंग 99, असद फुदादिन 49 धावा. जहीर खान 59/4, अभिषेक नायर 45/2).

जहीरचा पराक्रम
टीम इंडियातून बाहेर असलेल्या अनुभवी जहीरने सामन्यात 5 बळी घेऊन पुनरागमनाचे संकेत दिले. त्याने पहिल्या डावात भारव्हाइट आणि दुसर्‍या डावात धोकादायक ठरणार्‍या पोलार्ड, नरसिंग, ऑशले नर्स व एम. कुमिन्स या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.