आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या 4 पॅरालिंपियन खेळाडूंनी 'पॉजिटिव्हीटी'साठी केले न्यूड फोटोशूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27 वर्षाची टेनिस स्टार जॉर्डेन म्हणते, 'दिव्यांग खेळाडू शरीराने परफेक्ट नसतील पण मानसिक दृष्ट्या ते खूपच मजबूत आहेत. आमच्या शरीराकडे सहानुभूती म्हणून न पाहता एक पाजिटिव्ह नजरेने पाहिले गेले पाहिजे.' - Divya Marathi
27 वर्षाची टेनिस स्टार जॉर्डेन म्हणते, 'दिव्यांग खेळाडू शरीराने परफेक्ट नसतील पण मानसिक दृष्ट्या ते खूपच मजबूत आहेत. आमच्या शरीराकडे सहानुभूती म्हणून न पाहता एक पाजिटिव्ह नजरेने पाहिले गेले पाहिजे.'
लंदन- मॉडेल बनण्यासाठी ना सुंदर असावे लागते ना परफेक्ट फिगर, असे म्हणणे आहे ब्रिटनमधील चार पॅरालिंपियन यांचे. हे चार खेळाडू आहेत- टेनिस स्टार जॉर्डेन व्हिले, स्वीमर लुईस एडवर्ड्स, स्प्रिंटर बेथनी वुडवर्ड आणि पावर लिफ्टर अली जावद. या चार दिव्यांग खेळाडूंनी 'पॉजिटिव्हिटी'चे प्रमोशन करण्यासाठी एका स्पोर्ट्स मॅगझीनसाठी हे न्यूड फोटोशूट केले. हे खेळाडू 7 सप्टेंबरपासून रिओत होणा-या पॅरालिंपिकमध्ये सहभागी होत आहेत. काय म्हणतात हे पॅरालिंपिक प्लेयर्स...
- 27 वर्षाची टेनिस स्टार जॉर्डेन म्हणते, 'या फोटोशूटद्वारे मी सांगू इच्छिते की, मॉडेल बनण्यासाठी फक्त बाह्य सौंदर्य असणे गरजेचे नाही. आतील सुंदरताही महत्त्वाची ठरते. मी परफेक्ट नाही, मात्र माझे माझ्यावर प्रेम आहे. मी हेल्दी आहे आणि एक महिलेसाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे.
- ती पुढे म्हणते, 'दिव्यांग खेळाडू शरीराने परफेक्ट नसतील पण मानसिक दृष्ट्या ते खूपच मजबूत आहेत. आमच्या शरीराकडे सहानुभूती म्हणून न पाहता एक पाजिटिव्ह नजरेने पाहिले गेले पाहिजे.'
- जॉर्डेनने लंडन पॅरालिंपिक (2012) मध्ये ब्राँझ जिंकले होते. ती ब्रिटनमधील सर्वात यशस्वी पॅरा टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. तिने 2014 मध्ये कॅलेंडर ग्रॅंडस्लॅम पूर्ण केले होते.
- जॉर्डेन ब्रिटिल बोन डिसीजने ग्रस्त आहे. या आजाराने संबंधित व्यक्तीची हाडे ठिसूळ होतात व ती लवकर खराब होतात. तिच्या शरीरातील 200हून अधिक विविध हाडांपैकी 26 हाडे तुटली आहेत.
यांनीही फोटोशूट करून दिला संदेश-
- लंडन ऑलिंपिकमध्ये टी 37 200 मी. रेसमधील सिल्वर मेडलिस्ट 23 वर्षाची बेथनीने फोटोशूटद्वारे आपली परफेक्ट टोन्ड बॉडी दाखवली. तिला सेरेब्रल पाल्सी आहे. यात तिच्या मांसपेशींचा आणि मेंदूशी ताळमेळ बसत नाही.
- फोटोशूटमध्ये हिस्सा घेणारा लुईस ब्रिटिश आर्मीत होता. त्याने इराकमध्ये कार अॅक्सिडेंटमध्ये एक हात गमावला. त्याने इन्विक्टस गेम्समध्ये ट्रायथलॉनमध्ये चार गोल्ड जिंकली आहेत.
- लुईसने सांगितले की, 'अॅक्सिडेंटनंतर मी निराश झालो होतो. मात्र मला खेळाने यातून बाहेर पडण्यास मदत झाली.'
- 27 वर्षाचा पावरलिफ्टर अली आपल्या शरीराच्या वजनापेक्षा तीन पट अधिक वजन उचलतो.
- जन्मापासून अलीला पाय नाहीत. लेबनानमध्ये जन्मलेल्या अलीने 16 वर्षीपासून पावरलिफ्टिंग करणे सुरु केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पॅरालिंपिक खेळाडूंच्या मॉडेलिंगचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...