आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Players Palyed Better Than Yuvraj But Could Not Get That Much Money

आयपीएल-8 मध्‍ये सर्वांधीक महागडा ठरलेला युवी, धावा वसूल करण्‍यात पिछाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल ) सोमवारी लिलाव झाला. दिल्‍ली डेअरडेविल्‍सने भारताच्‍या अष्‍टपैलू युवराज सिंगला 16 कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केले. युवी यंदाच्‍या पर्वातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला. मात्र युवी धावा वसूल करण्‍यात अन्‍य महागड्या खेळाडूंपेक्षा पिछाडीवर आहे.
गतवर्षीच्‍या आयपीएल 7 मध्‍ये युवराज सिंगला रॉयल चॅलेजर्स बंगळूरुने 14 कोटी रुपयांमध्‍ये युवीला करारबध्‍द केले होते. मात्र, युवी आयपीएलच्‍या 14 सामन्‍यामध्‍ये तीन अर्धशतकांच्‍या मदतीने 376 धावा काढू शकला. तर कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा रॉबिन उथप्पाने 1 6 सामन्‍यात पाच अर्धशतकांसह 660 धावा केल्‍या होत्‍या. त्‍यामुळे युवीची अन्‍य धावा काढणा-या खेळाडूंशी तूलना केली गेली. युवीच्‍या आधी चार खेळाडूंचा नंबर लागतो.
खेळाडू किंमत IPL 2014 मधील प्रदर्शन टीम
युवराज सिंह 16 कोटी 14 सामन्‍यांमध्‍ये 376 रन दिल्ली डेअरडेविल्स
रॉबिन उथप्पा* 5 कोटी 16 सामन्‍यांमध्‍ये 660 रन केकेआर
जेपी डुमिनी* 2.2 कोटी 14 सामन्‍यांमध्‍ये 410 रन दिल्ली डेअरडेविल्स
अक्षर पटेल* 75 लाख 17 सामन्‍यांमध्‍ये 17 विकेट किंग्स 11 पंजाब
मोहित शर्मा* 2 कोटी 11 सामन्‍यांमध्‍ये 18 विकेट सीएसके

(नोट: * मार्कचे खिळाडू आयपीएल 2015 च्‍या‍ लिलावात सहभागी नाहीत. त्‍यांना त्‍यांच्‍या संघांनी राखीव खेळाडू म्‍हणून ठेवले आहे.

चार खेळाडूंच्‍या एकूण किंमतीपेक्षा महागडा युवी
आयपीएल 2014 मध्‍ये सर्वांधीक धावा काढणा-या उथप्‍पा, ड्युमिनी आणि गोलंदाजीत शानदार प्रदर्शन करणा-या अक्षर पटेल आणि मोहित शर्मा यांची एकत्र रक्‍कम 9.95 कोटी रुपये आहे. परंतु, युवीचे आकडे पाहिल्‍यास तो पाच खेळाडूंच्‍या बरोबर असल्‍याचे दिसते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, आयपीएलच्‍या सातव्‍या पर्वामध्‍ये युवराजची खास छायाचित्रे...