आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 43 Nation's Players Participated In Asian Atheletics Competation

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 43 देशांचे खेळाडू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विसाव्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. येत्या 3 जुलैपासून पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलावर (बालेवाडी) स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 3 ते ७ जुलैदरम्यान होणा-या स्पर्धेच्या नेटक्या आयोजनासाठी राज्य शासनाची धडपड सुरू आहे.


आशियातल्या 43 देशांमधले ८६1 खेळाडू 1 जुलैपासून पुण्यात दाखल होण्यास सुरुवात होत आहे. क्रीडामंत्री आणि स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष पद्माकर वळवी यांनी गुरुवारी बालेवाडीला भेट देऊन तयारीची पाहणी केली. राज्याचे क्रीडा सचिव जे. एस. सहारिया, क्रीडा आयुक्त पंकज कुमार, आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सरचिटणीस सी. पी. वॉल्सन या वेळी त्यांच्यासमवेत होते.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 2 जुलैला संध्याकाळी होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या समारोपाला केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्रकुमार व उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत.


मॉस्कोला थेट प्रवेश
पुण्यातल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंना मॉस्को (रशिया) येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे.
05 दिवस स्पर्धा
43 देशांचे खेळाडू
861 धावपटूंचा सहभाग
48 एकूण सुवर्णपदके


चाहत्यांना विनामूल्य प्रवेश
दररोज सकाळी ९ ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत स्पर्धा खेळली जाणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्याचा कालावधी असला तरी स्पर्धा अखंडपणे सुरू राहतील. पावसामुळे अ‍ॅथलेटिक्सला फरक पडणार नाही, असे वॉल्सन यांनी स्पष्ट केले.


बालेवाडीचा दर्जा उंचावणार
बालेवाडी (पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. यामुळेच आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेच्या आयोजन महाराष्ट्राने स्वीकारले आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वेळेवर कामे पूर्ण होतील.
जे. एस. सहारिया, क्रीडा सचिव.