आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 4th Ashes Test, Day 3: Another Bell Century Puts England On Top

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅशेस : बेलचे शतक; इंग्लंडची आघाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेस्टर ली स्ट्रीट - अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या डावात इंग्लंडच्या इयान बेलने (105) नाबाद शतक ठोकले. या शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसर्‍या डावात तिसर्‍या दिवसअखेर 5 गड्यांच्या मोबदल्यात 234 धावा काढून 202 धावांची आघाडी घेतली होती. इयान बेल व टीम ब्रेसनन खेळत आहेत.

इंग्लंडला पहिल्या डावात 238 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 270 धावा काढल्या. कांगारूंनी पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेतली. दुसर्‍या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी ऑस्ट्रेलियन संघ 5 बाद 222 धावा अशा सुस्थितीत दिसत होता. मात्र, रविवारी कांगारूंनी उर्वरित पाच विकेट अवघ्या 48 धावांत गमावल्या. पाहुण्या संघाकडून रोर्जसने सर्वाधिक 110 तर वॉटसनने 68 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने 71 धावांत 5 तर अ‍ॅडरसन व ग्रीम स्वान यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

दुसर्‍या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 49 धावांत इंग्लंडचे अ‍ॅलेस्टर कुक (22), जो. रुट (2), जोनाथन ट्रॉट (23) तीन प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. ऑस्ट्रेलिया संघाची सामन्यावर पकड मजबूत होत आहे, असे वाटत असताना मधल्या फळीत पीटरसन आणि बेल यांनी चौथ्या गड्यासाठी 106 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. मात्र, लियोनने पीटरसनला बाद केले. त्याने 84 चेंडूंत सहा चौकारांसह 44 धावा काढल्या. त्यानंतर बेलने बैरस्ट्रोसोबत 5 गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली. मात्र, पुन्हा लियोनने ही जोडी फोडली. नॅथन लियोनने 46 धावा देत शानदार दोन विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : 238. ऑस्ट्रेलिया : 270. इंग्लंड दुसरा डाव 5 बाद 234. (पीटरसन 44, इयान बेल खेळत आहे 105, 3/40 हॅरिस, 2/46 लियोन).

कसोटी शतकामुळे रोर्जस भावुक
इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेत आपल्या कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर क्रिस रोर्जस भावुक झाला. यजमान इंग्लंडविरुद्ध 2-0 ने मागे पडल्यानंतर मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत रोर्जसचे शतक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रोर्जसने चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी नाबाद 102 धावांची खेळी केली.