बर्मिंगहम - एजबेस्टन मैदानावर भारत आणि इग्लंड यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इग्लंड संघावर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयामुळे भारतीय संघाने ही मालिका 4/0 ने जिंकली आहे.
यजमान इंग्लंडने 49.3 षटकामध्ये सर्वबाद 206 धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कागिरी केली. आता लक्ष भारताच्या सलामीवीरांकडे आहे.
शमीने टिपले तीन मोहरे
मोहम्मद शमी गोलंदाजीचा अप्रतिम नमुना सादर करत गॅरी बॅलन्स, जोस बटलर, हॅरी गुरनी, या तीन फलंदाजांना तंबूत पाठविले. इंग्लंडकडून मोईन अलीने अर्धशतकीय पारी खेळली.
भुवनेश्वरने टिपले सलामीवीर
भुवनेश्वर कुमारने अतिश सुरेख गोलंदाजी करत इंग्लंडच्या आघाडीवीरांना तंबूत परतवले आहे. हेल्स आणि एलिस्टर कुकला केवळ 15 धावसंख्येवर बाद केले. तर मोहम्मद शमीनेही गॅरी बॅलेन्सला झेलबाद केले.
पुढील स्लाइडवर वाचा, दोन्ही संघामध्ये केलेले महत्वपूर्ण बदल, आणि पाहा PICS