(चाहत्यांना ऑटोग्राफ देताना विराट कोहली, दुस-या फोटोमध्ये निराश मुद्रेत इंग्लंडचा कर्णधार कुक)
'जो जिता वही सिकंदर' असे म्हटले जाते' याचा प्रत्यय भारतीय संघ सध्या अनुभवत आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड सोबत कसोटी मालिका गमावलेला भारतीस संघ टीकेचा धनी झाला होता. पण त्याच धर्तीवर पराभवाचा वचपा काढत एकदिवसीय मालिका आपल्या नावावर करणा-या टीम इंडियाचा स्टारडम परत आला आहे.
ऑटोग्राफसाठी गर्दी
इंग्रजांच्याच मायदेशी त्यांची नांगी ठेचणात्या भारताच्या या विजयी विरांचा ऑटोग्रॉफ घेण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती.
विराट कोहली व्यस्त
भारताचा उपकर्णधार विराट कोहलीचे इंग्लंडमध्ये मोठ्याप्रमाणावर फॉलोअर्स आहेत. भारताच्या विजयात विराटचा म्हणावा तसा काही रोल नव्हता तरीही त्याच्या ऑटोग्राफसाठी इंग्लीश चाहत्यांचा त्याच्याभोवती गराडा होता. विराट कोहली 3 चेंडू खेळून 1 धावेवर नाबाद परतला होता.
गणपती बाप्पा मोरयाचा गजर
जसजसा भारतीय संघ विजयाच्या समीप आला होता त्यावेळी 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषाने संपूर्ण मैदान दणाणून गेले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, एकदिवसीय सामन्यामधील रोमहर्षक छायाचित्रे..