आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे राष्ट्रीय रँकिंग तिरंदाजी स्पर्धेस सुरुवात झाली. स्पर्धेत देशातील अव्वल 68 खेळाडू सहभागी झालेल्या आहेत. स्पर्धा रविवारपर्यंत चालणार आहे.
स्पर्धा भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा धनुर्विद्या संघटना व साई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंदाजीची शहरात मोठी स्पर्धा होत आहे. तीत देशातील ऑलिम्पिकपटू, अर्जुन पुरस्कार विजेत्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी साईचे सहायक संचालक वीरेंद्र भंडारकर, इंडियन आर्चरी फेडरेशनचे एच. एल. जिंदल, आर. के. सिंग, सहसचिव प्रमोद चांदूरकर, आयोजन समितीचे अध्यक्ष सचिन मुळे, लक्ष्मीकांत खिची, संदीप नागोरी, विनोद नरवडे, गोविंद शर्मा आदींची उपस्थिती होती.
जागतिक स्पर्धेत पदक निश्चित : लीम
भारतीय तिरंदाज चांगला फॉर्मात आहे. कोरियाला पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. आगामी तुर्की येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा एकदा पदक पटकावेल, असा मला विश्वास आहे, असे भारतीय तिरंदाजी संघाचे विदेशी प्रशिक्षक चेह वोह लीम यांनी म्हटले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.