जकार्ता - भारताची टॉप बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिने आज (शनिवार) वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पटकावून इतिहास रचला. यामुळे काहीही झाले तर तिला किमान रजत पदक तरी हमखास मिळणार आहे. हे यश प्राप्त करणारी ती देशातील पहिली बॅडमिंटन खेळाडू ठरणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकाही भारतीय खेळाडूने कांस्य पदकाशिवाय वरचे पदक जिंकले नाही.
55 मिनटांत हरवले
जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान असलेल्या सायना हिने सेमीफायनलमध्ये इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानतेरी हिला 21-17, 21-17 च्या फरकाने हरवले. हा खेळ 55 मिनीट चालला. या दोघींमध्ये आतापर्यंतची ही चौथी लढत होती. यात तीन वेळा सायना तर एका वेळी फानतेरी जिंकली. सायनाने शुक्रवारी क्वॉर्टर फाइनलमध्ये चीनच्या यिहान वांग हिला 21-15 19-21 21-19 च्या फरकाने हरवले होते. दुसरीकडे फानतेरीने क्वार्टर फाइनलमध्ये चीनी ताइपेच्या ताए जू यिंगला 14-21, 22-20, 21-12 ने पराभूत केले होते.
पुढील स्लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...