आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs Bangladesh, Live 2017 ICC Champions Trophy Second Semi Final At Edgbaston Birmingham

टीम इंडियाने बांगलादेशला अस्मान दाखवले, 10 वर्षांनी भारत- पाक फायनलमध्ये आमनेसामने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहॅम - सामनावीर रोहित शर्माचे अकरावे वनडे शतक (नाबाद १२३) आणि कर्णधार विराट कोहलीच्या (नाबाद ९६) खेळीच्या बळावर टीम इंडियाने बांगलादेशला सहजपणे ९ विकेटने पराभूत करून सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता फायनलमध्ये १८ जून रोजी भारत-पाकिस्तान लढत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोन्ही संघांत प्रथमच फायनल होईल. 
 
सामन्यात टीम इंडियाने शानदार गोलंदाजी केल्यानंतर दमदार फलंदाजी केली. रोहित आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १७८ धावांची भागीदारी केली. भारताने सुरुवातीला बांगलादेशला ७ बाद २६४ धावांवर रोखले. यानंतर ४०.१ षटकांत १ बाद २६५ धावा काढून सहज विजय मिळवला.
 
भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर बांगलादेशला ३०० चा टप्पा ओलांडता आला नाही. सलामीवीर तमीम इक्बाल (७०) आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मुशाफिकूर रहीमने (६१) तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १२३ धावांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशला २६४ धावा काढता आल्या. मधल्या फळीचे फलंदाज अपयशी ठरले. सकिब १५, महमुदुल्लाह २१ धावा काढून बाद झाले. अखेरीस मुर्तुजाने नाबाद ३० आणि तस्किनने नाबाद १० धावा काढून २६४ पर्यंत संघाला पोहोचवले. भुवनेश्वर, बुमराह, केदारने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

धवन चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक यशस्वी फलंदाज  
या डावानंतर शिखर धवनच्या नावे चॅम्पियन्स ट्रॉफीत ८५ च्या सरासरीने ६८० धावा झाल्या आहेत. त्याने सौरव गांगुलीला (११ सामन्यांत ६६५ धावा) मागे टाकत चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक यशस्वी भारतीय फलंदाज बनण्याचा मान मिळवला. ओव्हरऑल धवन चौथ्या क्रमांकावर आहे. क्रिस गेल ७९१ धावांसह नंबर वन, जयवर्धने ७४२ धावांसह दुसऱ्या, तर कुमार संगकारा ६८३ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप-२ मध्ये फलंदाज भारतीय
शिखर धवन या स्पर्धेत गोल्डन बॅटच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. चार सामन्यांत त्याच्या ३१७ धावा आहेत. रोहित शर्मा ३०४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या तमीम इक्बालच्या २९३ धावा आहेत.

विराट अाठ हजारी
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने अापल्या वनडे करिअरमध्ये ८ हजार धावांचा पल्ला यशस्वीपणे गाठला. त्याने सर्वात वेगवान १७५ डावांमध्ये हा पराक्रम गाजवला. त्याने बांगलादेशविरुद्ध उपांत्य सामन्यामध्ये नाबाद ९६ धावांची खेळी केली. यामुळे त्याला ८००८ धावांचा अाकडा पार करता अाला. यामध्ये २७ शतके अाणि ४२ अर्धशतकांचा समावेश अाहे. त्याचा हा १८३ वा वनडे सामना ठरला.
 
भारत, पाकच्या यशाचे रहस्य एकच   
१९ विकेट भारतीय संघाने या स्पर्धेच्या ११ ते ४० षटकांदरम्यान घेतल्या आहेत. इतर कोणत्याही संघापेक्षा ही आकडेवारी अधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. पाकने १८ विकेट घेतल्या. आता या दोन संघातच फायनल होईल.
 
रोहित मॅन ऑफ द मॅच
१२९ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सलामीवीर रोहित शर्माने १२३ धावा केल्या.

... मी पुरता तंदुरुस्त
रोहितशर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर सहा महिन्यांनी मैदानावर उतरला तो या स्पर्धेत. त्याने या सामन्यात शतकही ठोकले. रोहितची विंडीज दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. मात्र, आपण तंदुरुस्त असल्याचे त्याने या खेळीतून सिद्ध केले.

विक्रमी कामगिरी
- ४२ वर्षांत टीम इंडिया नवव्या वेळी एखाद्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल.
- वेळा या ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारताचा नवा विक्रम.
- या स्पर्धेत भारताने १९ विकेट ११ ते ४० षटकांदरम्यान घेतल्या.
- चॅम्पियन्स ट्रॉफीत धवन सर्वात यशस्वी फलंदाज.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा सामन्‍यातील क्षणचित्रे आणि संक्षिप्‍त धावफलक..
 
बातम्या आणखी आहेत...