आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 गोष्टी टीम इंडियासाठी ठरू शकतात धोकादायक! IND Vs PAK आज फायनल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - भारत-पाकिस्तानचा सामना कुठल्याही फायनलपेक्षा कमी नसतो. आणि आता तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. 10 वर्षांनंतर आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेच्या फायनलमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. याआधी भारताने 2007मध्ये टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पाकला हरवले होते. किताबाची प्रबळ दावेदार टीम इंडिया आणि अंडरडॉग म्हणून हिणवली जाणारी पाकिस्तानी टीम रविवारी जबरदस्त संघर्ष करतील. या वेळीही टीम इंडियाला विजयाची प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु पाकिस्तानी संघाने ज्याप्रकारे मागचे तीन सामने खेळले आहेत, त्यावरून विराट कोहलीला सतर्क राहण्याची गरज आहे. ही हायव्होल्टेज फायनल 18 जूनला खेळली जाईल. याआधी divyamarathi.com सांगत आहे या 5 गोष्टी ज्यांच्याकडे टीम इंडियाला लक्ष द्यावे लागेल.
 
भारताचे स्पेशालिस्ट गोलंदाज ब्रेक-थ्रू मिळवण्यात अपयशी...
- बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने भलेही सेमीफायनल जिंकली, परंतु एक वेळ अशी होती जेव्हा तमीम इक्बाल (70) आणि मुशाफिकूर रहीम (61) यांची 123 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाची धाकधूक वाढली होती. तेव्हा संघाला स्पेशालिस्ट गोलंदाज विकेट नाही देऊ शकले आणि विराटला केदार जाधवला ट्राय करावे लागले. केदारने मात्र दोन महत्त्वाच्या विकेट घेऊन ही निवड सार्थ ठरवली.
- फक्त भुवनेश्वरलाच सुरुवातीला 2 विकेट मिळाल्या. बुमराहने धावा रोखण्याचे काम केले. त्या तुलनेत अश्विन, जडेजा आणि पंड्या यांचा खेळ चांगला नव्हता.
 
श्रीलंकेविरुद्ध 300+ धावा करूनही हरले...
- असेच काहीसे भारतीय गोलंदाजांबाबत लंकेविरुद्धच्या सामन्यातही घडले होते. लंकेच्या तरुण फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. त्या सामन्यात श्रीलंकन फलंदाजांनी 159 धावा आणि दोन अर्धशतकांची भागीदारी केली होती. सामन्यात एकमेव विकेट भुवनेश्वर कुमारलाच मिळाली, तर दोन खेळाडू यष्टिचीत झाले. त्याच सामन्यात जडेजाने 8.66, उमेश यादवने 6.93, बुमराहने 5.2 आणि पंड्याने 7.28 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या, पण त्यांना विकेट नाही मिळाली.
 
हेही जरूर वाचा
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा टीम इंडियाला पाकच्या कोणत्या गोलंदाज आणि फलंदाजांपासून सावध राहावे लागेल...
बातम्या आणखी आहेत...