आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Dravid Said, Virat Kohli Should Avoid Making Any Changes To The Team For The Champions Trophy Final

IND-PAK फायनलच्या आधी द्रविडने दिला सल्ला, मॅचमध्ये ही चूक करू नये विराटने...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगोदर टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने विराट कोहलीला हा सल्ला दिला आहे. द्रविडने म्हटले, पाकविरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने संघात कुठलाही बदल न करता उतरले पाहिजे. 
 
केदार-पंड्याची सांगितली खास भूमिका...
- द्रविड म्हणाला, मला असे वाटते की विराटने त्याच्या मनासारखीच रणनीती ठेवावी. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आपण पाहिलेच आहे की भारताला धावांचा पाठलाग करणे फायद्याचे आहे. संघात खूप अनुभवी खेळाडू आहेत जे कठीण परिस्थितीत संघाला उभारी देऊ शकतात. म्हणूनच विराटने सध्याच्या संघात कुठलाही बदल करणे टाळले पाहिजे.
- राहुल पुढे म्हणाला, लोकं तर प्रश्न करतीलच की पहिल्या 10 ओव्हरमध्ये तुम्ही 4.8 अॅव्हरेजने धावा का केल्या? परंतु आपल्याला माहिती आहे की रोहित आणि शिखरने इनिंग कशी खेळली. आपल्याजवळ हार्दिक पंड्या, धोनी, युवराज, केदार जाधव आणि जडेजासारखे असे खेळाडू आहेत जे आपल्या आक्रमक फलंदाजीने कुठल्याही क्षण सामन्यात फेरबदल करू शकतात.
- द्रविड म्हणाला, भारत लक्ष्याचा पाठलाग करण्यात तरबेज आहे. परंतु फायनलमध्ये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर लोअर ऑर्डरमध्ये केदार जाधव आणि हार्दिक पंड्याची मोठी भूमिका राहील. 
- फायनलमध्ये पाकिस्तानच्या परफॉर्मन्सवर द्रविड म्हणाला, हा एक शानदार फायनल राहील. मला वाटते की पाकिस्तान या सामन्यात काही विशेष करील. त्यांच्याजवळ शोएब मलिक आणि मोहंमद हाफिजच्या रूपात खूप अनुभवी खेळाडू आहेत. ते अनुभवाच्या जोरावर सामन्याला कलाटणीही देऊ शकतात.
 
सेमीफायनलमध्ये केदारची बॉलिंग ठरली टर्निंग पॉइंट...
- सामन्यात बांगलादेशच्या तमीम इक्बाल (70) आणि मुशफिकूर रहीम (61) यांच्या आऊट होणे सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. सुरुवातीला दोन विकेट लवकर गेल्यानंतर या दोघांनी संघाला सावरले होते. हे दोघे वेगाने धावा काढत होते. यादरम्यान धोनीच्या सल्ल्यानुसार विराटने केदार जाधवला चेंडू सोपवला. आणि केदारनेही केवळ 25 धावांत या दोन्ही फलंदाजांना तंबूत पाठवले. दोघे बाद झाल्याने बांगलादेशी संघाला उतरती कळा लागली.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, मागच्या बांगलादेशविरुद्ध सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी करणारे 6 खेळाडू...
बातम्या आणखी आहेत...