आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५०० वी कसोटी : भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी आजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत गुरुवारपासून येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर होणार आहे. भारताचा विराट कोहली आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन यांचा जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांत समावेश आहे. आता हे दोघे आपापल्या संघाचे नेतृत्व करतील. दोन्ही संघांकडे दमदार खेळाडूंची फौज आहे. यामुळे दोन्ही संघ विजयाचा दावा करत आहेत. तसे भारतात न्यूझीलंडचा मागचा रेकॉर्ड खास नाही. अशात कोहलीच्या नेतृत्वाखालील यजमान संघाची बाजू उजवी दिसत आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकणाऱ्या भारतीय संघाकडून कोहलीची फलंदाज आणि कर्णधार म्हणूनसुद्धा कामगिरी शानदार राहिली आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकली, तर कोहलीच्या नेतृत्वात मालिका विजयाचा हा ‘चौकार’असेल. दुसरीकडे केन विल्यम्सनवर भारताच्या भूमीवर न्यूझीलंडला प्रदीर्घ कालावधीनंतर विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.

अवघ्या २ कसोटींत यश
न्यूझीलंडची भारतीय भूमीवरची कामगिरी अत्यंत सुमार ठरली आहे. न्यूझीलंडने भारतात ३१ कसोटी सामने खेळताना केवळ २ मध्ये विजय मिळवला. किवी संघाने भारतात अखेरीस १९८८ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर दोन्ही संघात भारतीय भूमीवर झालेल्या १४ कसोटींपैकी ६ मध्ये भारताने िवजयश्री मिळवली, तर ८ सामने ड्रॉ झाले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अखेरच्या तीन सामन्यांत भारताने सर्व लढती जिंकल्या. अशात किवी संघाचे नशीब बदलण्याचे आव्हान विल्यम्सनच्या खांद्यावर असेल. भारताने ही मालिका जिंकली तर क्रमवारीत नंबर वन होण्याचीही संधी आपल्याकडे असेल.

दोन्ही संघ असे
भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवीचंद्रन अश्विन, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, शिखर धवन, इशांत शर्मा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, मार्क क्रेग, मार्टिन गुप्तिल, टॉम लॉथम, हेनरी निकोल्स, ल्युक रोंची, मिशेल सँटनर, ईश सोढी, टीम साऊथी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बी. जे. वॉटलिंग, जेम्स निशाम.

भारताची मजबूत बाजू
>फलंदाजीत लोकेश राहुल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्यावर मदार असेल.
>गोलंदाजीत आर. अश्विन मुख्य गोलंदाजाची भूमिका पार पाडेल.
>अार. अश्विन फलंदाजीतही जोर दाखवू शकतो. त्याने विंडीजमध्ये दोन कसोटी शतके ठोकली होती.
छायाचित्र: सरावादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली.
बातम्या आणखी आहेत...