आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५०० वी कसाेटी: दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या पहिल्या डावात १ बाद १५२ धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी धावा काढताना न्यूझीलंडचा लँथम अाणि विलियम्सन. - Divya Marathi
पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी धावा काढताना न्यूझीलंडचा लँथम अाणि विलियम्सन.
कानपूर - कर्णधार केन विलियम्सन (नाबाद ६५) अाणि टाॅम लँथम (नाबाद ५६) यांनी पाहुण्या न्यूझीलंड संघाला शुक्रवारी भारताविरुद्ध सलामीच्या कसाेटी सामन्यातील पहिल्या डावात दमदार सुरुवात करून दिली. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे या दाेघांच्या माेठ्या खेळीच्या अाशेवर पाणी फेरले. यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ हा ३४ षटकांपुर्वीच थांबवावा लागला. त्यामुळे या दाेघांच्या अभेद्य भागीदारीच्या बळावर न्यूझीलंड संघाने दिवसअखेर १ बाद १५२ धावांची खेळी केली. अद्याप १६६ धावांनी पिछाडीवर असलेल्या पाहुण्या न्यूझीलंडकडे ९ विकेट शिल्लक अाहेत. मैदानावर विलियम्सन अाणि लँथम हे दाेघे खेळत अाहेत. तत्पूर्वी, यजमान भारताने अापल्या एेतिहासिक ५०० व्या कसाेटीच्या पहिल्या डावात ३१८ धावांची शानदार खेळी केली. अाता शनिवारी तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सकाळी ९.१५ वाजता सुरुवात हाेणार अाहे.

न्यूझीलंड टीमने पहिल्या डावात चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलामीवीर मार्टिन गुप्तिलला फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. उमेश यादवने सकाळच्या पहिल्या सत्रात गुप्तिलला बाद करून टीम इंडियाला पहिला बळी मिळवून दिला. गुप्तिलने ३१ चेंडूंचा सामना करताना २१ धावांचे याेगदान दिले. यात तीन चाैकारांचा समावेश अाहे. याशिवाय त्याने लँथमसाेबत पहिल्या गड्यासाठी ३५ धावांची भागीदारी केली.
त्यानंतर अालेल्या कर्णधार विलियम्सनने संयमी खेळी करताना सलामीच्या लँथमला चांगली साथ दिली. यासह त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११७ धावांची अभेद्य भागीदारी करून टीमच्या धावसंख्येला गती दिली. याशिवाय या दाेघांनीही अापल्या नावे वैयक्तिक अर्धशतकांची नाेंद केली.

विलियम्सनने ११५ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकारांच्या अाधारे शानदार नाबाद ६५ धावांची खेळी केली. तसेच लँथमने १३७ चेंडूंत नाबाद ५६ धावा साकारल्या. यात पाच चाैकारांचा समावेश अाहे. भारताकडून दुसऱ्या दिवशी उमेश यादवला छाप पाडता अाली. त्याने २२ धावा देताना एक गडी बाद केला. मात्र, इतर गाेलंदाजांना सूर गवसला नाही.

तत्पूर्वी, भारताने सकाळी ९ बाद २९१ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. उमेश यादव (९) अाणि जडेजाने (नाबाद ४२)दहाव्या विकेटसाठी शानदार ४१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला अापल्या धावसंख्येचा अालेख उंचावता अाला.

दुपारी मुसळधार पाऊस
सकाळी पहिल्या सत्राला चांगली सुरुवात झाली. भारताने अापला पहिला डाव संपवला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडला मात्र दुपारी २.३० वाजेपर्यंतच खेळावे लागले. त्यानंतर दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीची खेळ थांबवावा लागला. त्यानंतर ३.४५ वाजता मैदानाची पाहणी करण्यात अाली. मात्र, मैदान पूर्णपणे अाेले असल्याच्या कारणाने ३.५० वाजता खेळ संपल्याचे जाहीर करण्यात अाले.
पुढे पाहा सामन्याचे धावफलक..
बातम्या आणखी आहेत...