आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रन मोजता-मोजता अंपायरची दमछाक, एकाच बॉलमध्ये काढल्या 286 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटमध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. आता एका बॉलमध्ये किती धावा होऊ शकतात असा प्रश्न विचारल्यावर आपले उत्तर काय असेल.... 1, 2, 7, 10, 20 बस्स... पण, इंग्लंडमध्ये एका बॉलमध्ये तब्बल 286 धावा काढल्याचा विक्रम आहे. 

 

ऑस्ट्रेलियात झाला हा कारनामा...
- जानेवारी 1894 मध्ये लंडनचे दैनिक 'पॉल मॉल गॅझेट'ने एक वृत्त प्रकाशित केले होते. त्यामध्ये या धावांच्या विक्रमाचा उल्लेख करण्यात आला. 
- 1865 मध्ये ऑस्ट्रेलियात डॉमेस्टिक मॅचमध्ये व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच XI च्या टीममध्ये सामना रंगला होता. त्यामध्येच एका बॉलमध्ये 286 धावा काढण्यात आल्या होत्या.
- मॅचमध्ये व्हिक्टोरियाच्या बॅट्समनने एक जबरदस्त शॉट मारला होता. चेंडू झाडाला जाऊन अडकला. यानंतर फलंदाजाने धावा पळून धावा काढण्यास सुरुवात केली आणि थांबलेच नाही.
- जोपर्यंत चेंडू झाडावर होता तोपर्यंत बॅट्समन धावातच होते. अंपायर रन मोजता-मोजता दमले होते. बॅट्समनने धावूनच 286 रन काढले. 
- एवढ्या धावा काढत असल्याचे पाहता फील्डिंग टीम घाबरली. ते सगळेच अंपायरकडे जाऊन फलंदाजांना थांबवण्याचे आवाहन करत होते. पण, काहीच फायदा झाला नाही. 

 

अखेर चेंडू काढला...
- अंपायर्सने बॉल परत मिळवण्यासाठी त्या झाडालाच कापण्याचे आदेश सुद्धा दिले. पण, इतक्या लवकर ते करणे सोपे नव्हते. 
- शेवटी, बॉल काढण्यासाठी शक्कल लढवण्यात आली. बंदूकीने त्या चेंडूवर नेम धरून फायर करण्यात आले आणि बॉल खाली पडला. 
- दैनिकाच्या वृत्तानुसार, चेंडू काढेपर्यंत बॅट्समन तब्बल 6 किमी पर्यंत धावले. त्यांनी चक्क 286 धावा काढल्या होत्या. 
- हीच ती मॅच होती, ज्याने धावून किती रन काढल्या जाऊ शकतात याची मर्यादा निश्चित करण्यात आली. तत्पूर्वी यासाठी मर्यादा नव्हती.
- यानंतर बदललेल्या नियमानुसार, एका बॉलवर फलंदाजांना धावून फक्त 3 रन काढता येऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...