आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटविना अनुष्काने साजरा केला पहिला व्हॅलेंटाइन डे; येथे होती Busy

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो आणि भावना देखील लोकांनी व्यक्त केल्या. पण, भारतात 2017 चे सर्वात चर्चित कपल राहिलेले क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एकत्र नव्हते. लग्नानंतरचा हा त्यांचा पहिला व्हॅलेंटाइन होता. तरीही अनुष्काने विराटला सोडूनच हा दिवस साजरा केला. दोघेही आप-आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने एकमेकांना वेळ देऊ शकले नाहीत. 

 

चित्रिकरणात व्यस्त होती अनुष्का...

- मध्यप्रदेशच्या अशोकनगर येथे अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा केला. यावेळी तिच्यासोबत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तिचा पती विराट नव्हता. 
- व्हॅलेंटाइन डे वर ती सदर बाजार येथील चंदेरीच्या कुंवर साहेब हवेलीत 'सुई धागा' या चित्रपटाचे शूट करत होती. अनुष्काने यावेळी माध्यमांशी संवाद साधला नाही. 
- एकीकडे अनुष्का चित्रिकरणात बिझी असताना दुसरीकडे, विराट सुद्धा दक्षिण आफ्रिकेत वनडे सिरीझमध्ये व्यस्त आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अनुष्काच्या शूटिंगचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...