आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेपटाऊन- क्रिकेट इतिहासात द. आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने मॅच फिक्सिंगची कबुली दिल्यानंतरची दुसरी मोठी घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने द. आफ्रिकेविरुद्ध तिसरी कसोटी जिंकण्यासाठी संघाने चेंडू कुरतडल्याचे कबूल केले. स्मिथने बेनक्राॅफ्टसोबत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबूल यांनीही कर्णधार हटवा, असे आदेश दिले. यानंतर कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना हटवण्यात आले. टीम पेन आता तात्पुरता कर्णधार असेल.
प्रथमच सामना सुरू असताना कर्णधार, उपकर्णधार हटवले, स्मिथ-वॉर्नरवर आजीवन बंदीची तयारी
- दोषींवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोड ऑफ बिहेवियरनुसार खटला चालेल. आजीवन बंदीही लागू होऊ शकते. चेंडू कुरतडला जात असल्याच्या योजनेची माहिती होती, असे स्मिथने म्हटले होते. म्हणूनच स्मिथ व वॉर्नर हेच खरे दोषी मानले जात आहेत.
लंचनंतर ड्रेसिंग रूममध्ये कुरतडायची योजना, संघाचे नेतृत्वही सामील
१. योजना बनवली
चेंडू कुरतडायची जबाबदारी सर्वात कनिष्ठ क्रिकेटपटूवर सोपवली
ड्रेसिंग रूममध्ये ऑस्ट्रेलियान संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ, डेिव्हड वॉर्नर, जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क, नाथन लायन यांनी चेंडू कुरतडण्याची योजना बनवली. प्रशिक्षक लेहमनही यात सामील असल्याचे बोलले जाते.
२. अमलात आणावे
निर्णयानुसार बेनक्राॅफ्टने चेंडूला टेपच्या बाजूने खराब केले. परंतु त्याचा कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला.
काय आहे प्रकरण?
- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने सांगितल्याप्रमाणे, बॉल टेम्परिंग करताना टीमचा ओपनिंग बॅट्समन कॅमरन बेनक्रॉफ्टची निवड झाली. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वाइट प्रदर्शनामुळे तो चर्चेत होता.
- बेनक्रॉफ्टने बॉल टेम्परिंगचे आरोप स्वीकारताना म्हटले, की मी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी उपस्थित होतो. असे करण्यासाठी आपल्यावर कुणी दबाव टाकला असा आरोप त्याने मान्य करण्यास नकार दिला.
- बेनक्रॉफ्ट ऑस्ट्रेलियात एक चर्चित खेळाडू आहे. त्याला कुणी तरी बॉलसोबत छेडछाड करण्याचे काम दिले होते असे सांगितले जात आहे.
- बेनक्रॉफ्टने लाइव्ह मॅचमध्ये आपल्या खिशातून पिवळ्या रंगाचा टेप काढताना दिसून आला आहे. त्याने ही टेप आपल्या खिशात लपवून आणली होती.
- मॅच सुरू असताना सगळेच खेळाडू एकत्रित आले. त्यानेच सगळ्यांना एका ठिकाणी जमवले होते. त्याचवेळी संधी मिळताच त्याने ग्राउंडवरून खडे उचलले आणि खिशातून टेप काढून त्या चेंडूवर लावला.
कसे पकडले?
- बॉल घासताना झालेल्या उशीरामुळे फील्डवर उपस्थित अंपायर्सला शंका आली. त्यांनी बेनक्रॉफ्टची चौकशी केली. तेव्हा त्याने अंपायर्सला सनग्लासेसचा बॉक्स काढून दाखवला.
- अंपायर एवढ्यात शांत झाले नाही. त्यांनी आपली शंका दूर करण्यासाठी टीव्हीवर तो सीन पुन्हा-पुन्हा पाहिला. तेव्हा चित्र स्पष्ट झाले. बेनक्रॉफ्टने आपल्या अंडरवेअरमध्ये टेप लपवून आणल्याचे दिसून आले.
पुढील स्लाइडव पाहा, अखेर पकडला गेला...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.