आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BCCI कडून महिला खेळाडूंना दुय्यम वागणूक, पुरुषांच्या तुलनेत इतकी कमी फी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - बीसीसीआयने 2017-18 साठी क्रिकेटर्सचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. त्यामध्ये 26 पुरुष क्रिकेटर्स आणि 19 महिला क्रिकेटर्स अशा दोहोंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या एका दिवसापूर्वी हे करारनामे जारी करण्यात आले तरीही महिला क्रिकेटर्ससोबत भेदभाव स्पष्ट दिसून येतो. नव्या करारांत BCCI ने पुरुष क्रिकेटर्सवर जणू पैश्यांचा पाऊसच पाडला. यात सर्वोच्च ग्रेडवर असलेल्या पुरुष क्रिकेटरला वार्षिक तब्बल 7 कोटी रुपये दिले जातील. पण, महिला क्रिकेटर्सबद्दल बोलावयाचे झाल्यास त्यांच्या फीची पुरुष क्रिकेटर्सशी तुलना देखील करणे अवघड आहे. 

 

इतका मोठा फरक
- पुरुष क्रिकेटर्सच्या ग्रेड ए+ क्रिकेटरला वार्षिक 7 कोटी रुपये दिले जातील. तर महिलांमध्ये टॉप ग्रेड क्रिकेटरला फक्त 50 लाख रुपये दिले जाणार आहेत. ग्रेड सी मध्ये असलेल्या शेवटच्या फळीतील पुरुष क्रिकेटर्सला सुद्धा 1-1 कोटी वार्षिक फी दिली जात असताना हा भेदभाव स्पष्ट दिसून येतो. 
- पुरुषांच्या टीमपैकी कॅप्टन विराट कोहली आणि इतर 4 अशा 5 जणांना नवीन ग्रेड ए+ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर ग्रेड ए मध्ये 7 पुरुष क्रिकेटर्सला समाविष्ट करण्यात आले. तर दुसरीकडे, महिलांच्या बाबतीत सर्वोच्च ग्रेड ए मध्ये फक्त 4 महिला ठेवण्यात आल्या आहेत. 

 

पुरुष क्रिकेटर्सची ग्रेडनिहाय वार्षिक फी...
- नवीन ग्रेड ए+ ग्रेडमध्ये 5 क्रिकेटर्सला समाविष्ट करण्यात आले आहे. यात कॅप्टन विराट कोहली व्यतिरिक्त रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या ठेवण्यात आले. 
- यासोबतच ग्रेड-ए मध्ये राहणाऱ्यांना वार्षिक 5 कोटी रुपये, ग्रेड बी मध्ये असणाऱ्यांना वार्षिक 3 कोटी आणि ग्रेड सी मध्ये असलेल्यांना वार्षिक 1 कोटी रुपये मिळतील. 

 

महिला क्रिकेटर्सची ग्रेडनिहाय वार्षिक फी
- बीसीसीआयने महिला क्रिकेटर्ससाठी 3 ग्रेड बनवले असून ते ग्रेड-ए, ग्रेड-बी आणि ग्रेड-सी असे आहेत. तिसरा ग्रेड याचवर्षी आणला गेला आहे. यापूर्वी फक्त ए आणि बी असे दोनच ग्रेड होते. 
- ग्रेड-ए मध्ये असलेल्या महिलांना 50 लाख, ग्रेड बी मध्ये असलेल्या महिला क्रिकेर्सना 30 लाख आणि ग्रेड सी मध्ये असलेल्यांना वार्षिक फक्त 10 लाख रुपये फी दिली जाईल. 
- त्यातही आणखी मोठा भेदभाव म्हणजे, ग्रेड-ए मध्ये 4, ग्रेड-बी मध्ये 6 आणि ग्रेड-सी मध्ये सर्वाधिक 9 महिलांना ठेवण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणत्या महिला क्रिकेटरचा कुठला ग्रेड, संपूर्ण यादी...

बातम्या आणखी आहेत...