आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BCCI च्या नवीन करारांची घोषणा, भुवनेश्वर-बुमराहला मिळतील धोनीपेक्षा जास्त पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - बीसीसीआय अॅडमिनिस्ट्रेटर्स कमिटीने बुधवारी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नवा वार्षिक करारनामा जारी केला. त्यामध्ये खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या फीमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. सोबतच एक नवा ग्रेड 'ए+' बनवण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली. यात समाविष्ठ केल्या जाणाऱ्या खेळाडूंना वार्षिक प्रत्येकी 7-7 कोटी रुपये दिले जातील. नव्या यादीत धोनीला टॉप ग्रेडमध्ये जागा देण्यात आली नाही. त्याला पूर्वीच्या ग्रेड-ए मध्येच ठेवण्यात आले आहे. नवीन करारात एकूणच 26 खेळाडू आहेत. 

 

आता असतील 4 ग्रेड...
- बीसीसीआयच्या संचलनासाठी जबाबदार असलेली प्रशासकीय समिती (CoA) ने बुधवारी ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018 पर्यंतच्या कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली. यात क्रिकेटर्ससाठी 4 ग्रेड तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार, त्यांना वार्षिक फी मिळेल. 
- बीसीसीआयने नव्या कॉन्ट्रॅक्टनुसार, क्रिकेटर्सच्या ग्रेडसाठी एक नवीन कॅटेगरी ए+ सुद्धा बनवली आहे. यात सामिल केल्या जाणाऱ्यांना सर्वाधिक फी दिली जाणार आहे. त्या प्रत्येकाला वार्षिक 7 कोटी रुपये इतकी फी दिली जाईल. 
- नवीन ग्रेड ए+ ग्रेडमध्ये 5 क्रिकेटर्सला समाविष्ट करण्यात आले आहे. यात कॅप्टन विराट कोहली व्यतिरिक्त रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या ठेवण्यात आले. 
- यासोबतच ग्रेड-ए मध्ये राहणाऱ्यांना वार्षिक 5 कोटी रुपये, ग्रेड बी मध्ये असणाऱ्यांना वार्षिक 3 कोटी आणि ग्रेड सी मध्ये असलेल्यांना वार्षिक 1 कोटी रुपये मिळतील. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच भारतीय कर्णधार विराट कोहली आणि टीमचे कोच रवी शास्त्री यांनी CoA प्रमुख विनोद राय यांची भेट घेतली होती. तसेच खेळाडूंच्या नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांची फी वाढवण्याची मागणी केली होती.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणता खेळाडू कोणत्या ग्रेडमध्ये

बातम्या आणखी आहेत...