आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: स्टार पप्पांच्या क्रिकेटर मुलाचा संघर्ष, अशी मिळाली होती टीममध्ये जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचे स्टार कर्णधार राहिलेले सुनील गास्कर यांचा मुलगा रोहन गावस्कर 20 फेब्रुवारी रोजी आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील खेळाडूंना टीममध्ये जागा मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. एका स्टार क्रिकेटरच्या मुलाला देखील टीममध्ये जागा मिळवणे काही सोपे नाही. वडिल जितके मोठे स्टार तितकाच त्यांच्या मुलांवर दबाव असतो. टीका करण्यासाठी सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच असतात. असेच काही रोहनसोबत घडले आहे.

 

सुनील गावसकर भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 10 हजारहून अधिक धावा काढल्या. त्यांना लिटिल मास्टर या नावाने ओळखले जाते. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 81 शतकांसह 25,834 रन काढणाऱ्या सुनील गावस्कर यांचा मुलगा जेव्हा पिचवर उतरला. तेव्हा स्टार वडिलांसारख्याच त्याच्याकडून अपेक्षा केल्या जात होत्या. पण, तो आपल्या वडिलांसारखा मोठा होऊ शकला नाही. 

 

रोहन गावसकरच्या वनडे डेब्यूमागे वीरेंद्र सेहवागचा मोठा हात आहे. रोहनला 2004 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय वनडे टीममध्ये निवडले गेले. व्हीबी सिरीजच्या पाचव्या वनडेपूर्वी टीमचा स्टार क्रिकेटर ओपनर वीरेंद्र सेहवाग जखमी झाला. त्याच्याच जागी रोहनला खेळण्याची संधी मिळाली. 2004 मध्येच चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना त्याच्यासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय खेळ ठरला.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, रोहन गावस्कर संबंधित आणखी काही फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...