आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची स्टार महिला क्रिकेटर हरमनप्रीतची डिग्री Fake; गमवावी लागेल DSP ची नोकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताची स्टार महिला क्रिकेटर आणि टी-20 टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरची मार्कशीट बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, पंजाब पोलिसांत तिची पोलिस उपाधीक्षकाची नोकरी संकटात सापडली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल तिला रकेल्वेत नोकरी देण्यात आली होती. यानंतर तिला पंजाब सरकारने डीएसपी पदावर नियुक्त केले. सीसीएस विद्यापीठातील रेजिस्ट्रार जीपी श्रीवास्तव यांनी गुरुवारी सांगितल्याप्रमाणे, मार्च महिन्यात पंजाब पोलिसांनी सत्यता पडताळून पाहण्यासाठी तिच्या पदवीची मार्कशीट मेरठ येथील चौधरी चरण सिंग (सीसीएस) विद्यापीठाकडे पाठवली होती. विद्यापीठाने केलेल्या चौकशीत तिची BA च्या अंतिम वर्षाची मार्कशीट फेक असल्याचे समोर आले. तिने पंजाब पोलिस विभागात जमा केलेल्या मार्कशीटची विद्यापीठात नोंद नाही. 

 

फसवणुकीचा खटला चालण्याची शक्यता
हरमनप्रीत कौरची बीए डिग्री फेक असल्याचे अधिकृतरित्या समोर आल्याने आता तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. सोबतच पंजाब पोलिसांकडे तिने पात्रतेसाठी जी इतर कागदपत्रे जमा केली होती. त्यांची सुद्धा चौकशी केली जाऊ शकते. यासह रेल्वे पोलिसांत तिने हीच कागदपत्रे दाखल केली होती. त्यामुळे, रेल्वे विभागाकडून सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

कुटुंबीय म्हणाले, शक्यच नाही
हरमनप्रीत कौरचे वडील हरमिंदर सिंग यांनी आपल्या मुलीवर लावलेले आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. आपल्या मुलीची डिग्री बनावट असूच शकत नाही. तसेच स्वतः मेरठला जाऊन सत्य काय ते तपासून पाहणार असे ते म्हणाले आहेत. हरमिंदर यांना त्यांच्या मुलीने रेगुलर डिग्री घेतली होती, की डिस्टंट हे विचारले असता त्यांना याची माहिती नाही. त्यांच्या मते, तिने 12 पर्यंतचे शिक्षण मोगा येथून केले. यानंतर महिला क्रिकेट टीममध्ये निवड झाल्यानंतर मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठातून बीएची डिग्री घेतली. हरमनप्रीतची एक बहिण प्राध्यापिका आहे.

बातम्या आणखी आहेत...