आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिग्री Fake असल्याची कल्पना नव्हती; DSP पदावरच ठेवा पुन्हा अभ्यास करेन -हरमनप्रीत कौर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - भारतीय महिला क्रिकेट टीमच्या टी-20 फॉरमॅटची कॅप्टन हरमनप्रीतने आपल्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. फेक डिग्रीवरून पोलिस उपाधीक्षकाचे पद गमवून हवालदार झाल्यानंतर ती पहिल्यांदाच समोर आली. एका स्पोर्ट्सपर्सनला नोकरी देणे आणि त्यानंतर डिमोट करणे हा अपमान असल्याचे ती म्हणाली. आपल्याला पोलिस अधिकाऱ्याची नोकरी ही शैक्षणिक पात्रतेवर नाही, तर गेमवरून मिळाली होती. त्यामुळे, डीएसपी पदावर कायम ठेवा पुन्हा अभ्यास करून डिग्री मिळवेन असे आवाहन तिने केले आहे. 


बनावट डिग्रीची कल्पना नव्हती...
हरमनप्रीत कौरने सांगितले, "त्या डिग्रीमध्ये काही समस्या असेल तर मला पुन्हा अभ्यास करण्यात काहीच हरकत नाही. प्रत्यक्षात, मला ती डिग्री बनावट असल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे, याच पदवीच्या आधारे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि नोकरी सुद्धा केली. ती डिग्री बनावट असल्याचे कळाले असते तर ती पोलिस अधिकारी पदासाठी दिली नसती. माझ्या गेममध्ये काही चूक असल्यास मला सांगा. परंतु, डीएसपी पदावरून काढू नका." तिने यासंदर्भात पंजाबच्या क्रीडा मंत्र्यांशी सुद्धा संवाद साधला आहे. 


पंजाब पोलिसांनीच केली होती चौकशी
पंजाबच्या मोगा येथे राहणारी भारताची स्टार महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौरने 1 मार्च रोजी राज्य पोलिसांत पोलिस उपाधीक्षकाचा पदभार स्वीकारला होता. यानंतर तिच्यावर बनावट डिग्री आणि कागदपत्रे दाखल करण्याचे आरोप झाले. यानंतर पंजाब पोलिसांच्या पथकाने स्वतः विद्यापीठात जाऊन हरमनच्या डिग्रीची चौकशी केली. यात तिची फायनल इयरची मार्कशीट बनावट असल्याचे समोर आले. हरमनच्या मार्कशीटवर जो परीक्षा क्रमांक आणि मार्क आहेत त्याचा विद्यापीठात रेकॉर्ड नाही.

बातम्या आणखी आहेत...