आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका, मारक्रम झेलबाद; 105 धावांवर 3 गडी बाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू झालेल्या सिरीझच्या पहिल्या वनडे सामन्यात आफ्रिकेने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 30 धावांतच दक्षिण आफ्रिकेचा पहिला बळी घेतला.  बुमराहने आमलाला पायचित करत माघारी धाडले. डरबनच्या किंग्समीड मैदानावर हा सामना खेळला जात आहे. 

 

Updates

 

- दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट, ए.के. मारक्रम झेलबाद

- आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले.

- युजवेंद्र चहलने डी कॉकला LBW केले.

- 100 धावा पूर्ण होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गडी देखील तंबूत परतला.

 

 

या मैदानावर भारताने साउथ आफ्रीका विरुद्ध 7 सामने खेळले आहेत. त्यापैकी एकही सामना भारताने जिंकला नाही. 6 सामन्यांत भारताचा पराभव झाला. तर एक सामना रद्द झाला होता. हा सामना जिंकल्यास किंग्समीड मैदानावर भारताने आफ्रिकेला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या (120 गुण) आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर (119 गुण) आहे. भारतीय संघाने ही सिरीज जिंकल्यास त्यांचा हा सलग 9 वा वनडे मालिका विजय ठरणार आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...