आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

India vs England: वनडे मालिकेतील पहिला सामना आज; चौथ्या क्रमांकावर उतरणार विराट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉटिंघम - भारत विरुद्ध इंग्लंड 3 सामन्यांच्या वनडे सिरीझचा पहिला सामना गुरुवारी भारतीय समयानुसार संध्याकाळी 5 वाजता खेळला जाणार आहे. पुढच्या वर्षी इंग्लंडमध्येच क्रिकेट वर्ल्डकप होत असल्याने भारतासाठी ही सिरीझ अत्यंत महत्वाची आहे. अशात टीमला इंग्लंडच्या स्विंग पिचवर प्रॅक्टिसची ही चांगली संधी आहे. यापूर्वी भारताने इंग्लंडला टी-20 सिरीझमध्ये पराभूत केले. विराटने काही नवीन प्रयोग केले होते, ते वनडे सामन्यात सुद्धा बदलण्याची अपेक्षा आहे. प्रामुख्याने विराट नंबर-3 वर बॅटिंगसाठी उतरतो. परंतु, पहिल्या वनडे सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या क्रमांकावर तो केएल राहुलला संधी देत आहे. टी-20 मालिकेत सुद्धा त्याने राहुलला तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची संधी दिली होती आणि स्वतः चौथ्या क्रमांकावर होता. विराट कोहलीला वनडेमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी 412 धावांची गरज आहे. या मालिकेचे सर्वच सामने सोनी टेनच्या वाहिन्यांवर पाहिले जाऊ शकतील. 


एकदिसीय रँकिंगमध्ये नंबर एक होण्याची संधी...
टीम इंडिया या मालिकेत 3-0 ने विजय नोंदवत असेल तर त्यांना वनडे रँकिंगमध्ये नंबर एक होण्याची संधी आहे. परंतु, एक मॅचही पराभूत झाल्यास इंग्लंड आहे त्या नंबर एकवर राहील. इंग्लंडला अशात 10 अंक मिळतील. सोबतच, वेस्टइंडीज-बांग्लादेश, झिम्बाब्वे-पाकिस्तान, श्रीलंका-दक्षिण अफ्रीका, नेदरलंड-नेपाल यांच्यात सुद्धा मालिका होणार आहे. 


धोनीकडेही विक्रमाची संधी
महेंद्र सिंह धोनीकडे या सिरीझमध्ये 10,000 धावांचा पल्ला गाठण्याची संधी आहे. तो आकड्यापासून फक्त 33 धावा दूर आहे. 33 धावा काढताच तो वनडेमध्ये 10 हजार धावा काढणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्या नावे आहे. सोबतच, युजवेंद्र चहलसाठी ही मालिका आठवणींची ठरू शकते. त्याने आतापर्यंत 43 वनडे विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने 7 गडी बाद केल्यास तो 50 वनडे विकेट घेणारा गोलंदाज ठरू शकतो. तर 10 विकेट घेऊन भुवनेश्वर कुमार 100 विकेटचा जादुई आकडा पूर्ण करू शकतो. 


भारत-इंग्लंडचा 1-1 खेळाडू जखमी
भारतासाठी या मालिकेत चिंता वाढल्या आहेत. भारताचा तूफान गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी असल्याने मालिकेत नाही. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर खेळत आहे. तर दुसरीकडे, इंग्लंड टीममध्ये सुद्धा सॅम कुरेन जखमी आहे. त्याच्या जागी टीममध्ये त्याचा भाऊ टॉम कुरेनला घेण्यात आले आहे. 


संभावित टीम
भारतः
विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.


इंग्लंडः इयान मॉर्गन (कप्तान), जेसन रॉय, जानी बेयर्स्टो, जोस बटलर, मोइन अली, जो रूट, जेक बाल, टॉम कुरेन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल राशिद, डेव्हिड विली, मार्क वूड.

 

बातम्या आणखी आहेत...