आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 मालिका; भुवनचे टी-20 मध्ये 5 बळी; भारताचा पहिला गाेलंदाज! धवनचे अर्धशतक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाेहान्सबर्ग- शिखर धवन (७२) पाठाेपाठ भुवनेश्वर कुमारच्या (५/२४) धारदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने रविवारी यजमान अाफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेमध्ये  विजयी सलामी दिली. भारताने अाफ्रिकेवर २८ धावांनी मात केली. टी-२० मध्ये पाच विकेट घेणारा भुवनेश्वर हा भारताचा पहिला वेगवान गाेलंदाज ठरला.  यासह  भारताने  वनडेपाठाेपाठ टी-२० मालिका विजयाच्या मिशनची दमदार सुरुवात केली. यासह भारताला ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी मिळाली. अाता बुधवारी दुसरा सामना सेंच्युरियनच्या मैदानावर हाेईल. 


शिखर धवनने (७२) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०३ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये दक्षिण अाफ्रिकेला १७५ धावांत राेखले.   


भारताच्या विजयामध्ये सलामीवीर धवनचे अर्धशतक माेलाचे ठरले. तसेच युवा फलंदाज मनीष पांडेने नाबाद २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान, सुरेश रैनाने १५ धावांचे याेगदान दिले. त्यामुळे टीमला धावांचा २०० चा अाकडा पार करता अाला. अाफ्रिकेकडून ज्युनियर डालाने दाेन विकेट घेतल्या.   


नाणेफेक जिंकून   अाफ्रिका संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीवीर राेहित शर्मा अाणि शिखर धवनने दमदार सुरुवात केली. 

 

धवनची तुफानी खेळी 
एकाकी झुंज देत भारताकडून सलामीवीर शिखर धवनने तुफानी फटकेबाजी केली. त्याने ३९ चेंडूंमध्ये १० चाैकार अाणि २ उत्तुंग षटकार खेचून ७२ धावांची खेळी केली. यामुळे त्याला संघाच्या धावसंख्येचा अालेख उंचावता अाला. त्याचे  हे चाैथे अर्धशतक ठरले. 

 

धवन- काेहलीची अर्धशतकी भागीदारी 
विराट काेहलीने डाव सावरला. त्याने वेळीच सावरणारी खेळी करताना सलामीच्या धवनलाही माेलाची साथ दिली. या दाेघांनी तुफानी फटकेबाजी करताना तिसऱ्या गड्यासाठी ५९ धावांची भागीदारी रचत धावसंख्येला गती दिली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक आणि फोटो...

बातम्या आणखी आहेत...