आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धा; भारत दुसऱ्यांदा विश्वविजेता, पाकचा केला पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- भारतीय संघाला डाेळस कामगिरीच्या बळावर अंधांच्या विश्वचषकावरचे अापले वर्चस्व अबाधित ठेवता अाले. भारताने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला. भारताने अंतिम सामन्यात दाेन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन अाणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. भारताने २ गड्यांनी अंतिम सामना जिंकला. यातून भारताला सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप ट्राॅफी अापल्या नावे करता अाली. यादरम्यान भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा  पाकिस्तानला फायनलमध्ये धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला. 


सुनील नरेश (९३) अाणि अजय कुमार रेड्डी (६२) यांच्या झंझावाताच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली.  प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ४० षटकांत ८ बाद ३०७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारताने ८ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. या भारताची निराशाजनक सुरुवात झाली हाेती. मात्र, वेळीच सुनील अाणि अजयने संघाचा डाव सावरला. त्यांनी पाकच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेत सामन्यावर मजबूत पकड घेतली. दरम्यान, सुनीलने झंझावाती ९३ धावांची खेळी केली. यामुळे त्याला भारताच्या विजयाचा मार्ग सुकर करता अाला. तसेच अजय रेड्डीनेही अापली तुफानी खेळी कायम ठेवली. त्यामुळे त्याला संघाच्या विजयात ६३ धावांचे महत्त्वाचे याेगदान देता अालेे. 

दाेन फाॅरमॅटचे अाता दाेन वर्ल्डकप भारताच्या नावे 
 भारताच्या अंधांनी क्रिकेटच्या विश्वात अापली वेगळी अाेळख निर्माण केेली अाहे.त्यामुळे भारताला क्रिकेटमध्ये अापला दबदबा निर्माण करता अाला. भारताने अाता क्रिकेटच्या दाेन फाॅरमॅटचे वर्ल्डकप अापल्या नावे केले अाहे. यामध्ये वनडे अाणि टी-२० क्रिकेटचा समावेश अाहे. भारताने वनडेचे वर्ल्डकप २०१४ अाणि अाता २०१८ मध्ये जिंकले.  भारताने २०१२ व २०१७ मध्ये टी-२०च्या विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावला अाहे. 

 

भारत तिसऱ्यांदा फायनलमध्ये 
भारताने या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा धडक मारली हाेती. भारताने यापूर्वी २००६ मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली हाेती. त्यादरम्यान पाकने भारताला पराभूत केले हाेते. मात्र, हाच पराभवाचा वचपा काढताना भारताने वर्ल्डकपच्या सलग दाेन फायनलमध्ये पाकला धूळ चारली. यात २०१४ अाणि २०१८ च्या वर्ल्डकपचा समावेश अाहे. 

 

विश्वविजेते संघ 

 

- १९९८ दक्षिण अाफ्रिका (फायनलमध्ये पाकवर मात)

- २००२  पाकिस्तान  (फायनलमध्ये अाफ्रिकेवर मात)

- २००६ पाकिस्तान (फायनलमध्ये भारतावर मात)

- २०१४  भारत   (फायनलमध्ये पाकिस्तानवर मात)

- २०१८ भारत  (फायनलमध्ये पाकिस्तानवर मात)

बातम्या आणखी आहेत...