आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रविडच्या दानशूरपणावर फिदा झाले फॅन्स; म्हणाले, पंतप्रधान होशील का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर राहुल द्रविड सध्या आपल्या दानशूर वृत्तीमुळे चर्चेत आहे. अंडर-19 टीमने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयने टीमचा कोच राहुल द्रविडला 50 लाख रुपये आणि सपोर्टिंग स्टाफला प्रत्येकी 20-20 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. पण, राहुल द्रविडला ते आवडले नाही. त्याने सर्वांना एकसारखेच बक्षीस देण्याची मागणी केली. त्याची ही मागणी पूर्ण झाली असून आता बोर्डाने सर्वांना 25-25 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी द्रविडने स्वतःला मिळत असलेल्या 50 लाखांतून 25 लाख रुपये वजा केले. तसेच आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येकी 5 लाखांचा फायदा मिळवून दिला. त्याच्या या दानशूर वृत्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, द्रविडच्या कौतुकात चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...