आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंड्याच्या चुकीवर माजी क्रिकेटर म्हणाला अहंकारी; फॅन्सने अशी घेतली शाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिका विरोधात दुसऱ्या टेस्ट सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये हार्दिक पंड्या फक्त 15 धावांवर बाद झाला. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे तो आऊट झाला होता. धावा काढताना बॉल स्टम्पला लागला त्यावेळी हार्दिकचा पाय आणि बॅट दोन्ही हवेत होते. यातून वाचण्यासाठी त्याने जमीनीवर बॅट टेकवण्याचा देखील प्रयत्न केला नाही. यावरून माजी इंडियन क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी ट्वीट करून पंड्याला अहंकारी म्हटले. त्यावर पंड्याचे समर्थक भडकले.
 
- हार्दिक पंड्या आपल्याच चुकीमुळे बाद झाला. यानंतर मांजरेकर यांनी एक ट्वीट करून लिहिले, 'हार्दिक पंड्यासाठी हा सुरुवातीचा धडा आहे. आत्मविश्वास जेव्हा अहंकार बनतो तेव्हा तुमचा खेळच तुम्हाला धडा शिकवतो. 
- मांजरेकरांच्या या ट्वीटवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी छोट्याशा चुकीवर माजी क्रिकेटरचे मोठे रिअॅक्शन असे म्हटले. 
- काही चाहत्यांनी मांजरेकरांच्या ट्वीटला होकार दिला. तसेच हार्दिक पंड्याला टीममधून बाहेर करण्याची मागणी केली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मांजरेकरांच्या ट्वीटला फॅन्सने दिल्या अशा प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...