आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच टीम मेंबरवर भडकला धोनी, सर्वांसमोर दिली शिवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 6 गडी राखून पराभूत केले आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली. या सामन्यात माजी कर्णधार एमएस धोनी आणि मनीष पांडे यांनी जबरदस्त बॅटिंग करत अर्धशतक ठोकले. त्यांच्याच जोरावर भारत 188 धावा पूर्ण करू शकला. पण, या मॅचमध्ये धोनीचा रंग पाहून सगळेच हैराण झाले. त्याने एकावेळी मनीष पांडेवर आपला राग काढला. तोही इतका की सर्वांसमोर शिवराळ भाषा वापरली. 

 

- धोनीचा हा राग शेवटच्या ओव्हरमध्ये दिसून आला. 19.1 ओव्हरनंतर टीम इंडियाचा स्कोर 171 झाला होता. त्यावेळी धोनीसमोर पांडे होता. 
- मॅचच्या पहिल्या बॉलमध्ये मनीषने शॉट खेळला आणि रन घेऊन थांबला. धोनी आणखी धावणार होता. पण, पांडेचे लक्ष त्याच्याकडे गेले नाही. 
- यावरूनच धोनी चिडला. त्याने आपले संतुलन गमवले आणि पांडेवर ओरडताना त्याला रागात शिवी सुद्धा दिली. ती लाइव्ह कॅमेऱ्याच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे. 
- धोनी रागात म्हणाला, 'अरे @#%& च्या इकडे पण बघ, तिकडे काय बघतोएस. आवाज येणार नाही इशारे बघत जा.'
- यानंतर धोनीने आपला राग बॉलरवर काढला. धोनीने या ओव्हरच्या उर्वरीत 5 बॉलवर 6, 4, 4, 2 आणि 1 अशा धावा काढत फिफ्टी पूर्ण केली.
- आपल्या सौम्य स्वभावामुळे आजही कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोनीचा हा अवतार पाहून फॅन्स हैराण झाले. धोनी एवढा रागातही येऊ शकतो यावर लोकांना विश्वास बसत नव्हता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या वर्तनानंतर सोशल मीडियावर आल्या अशा प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...