आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs SA: टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय; विक्रमी विजयाची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंच्युरियन- भारत आणि दक्षिण आफ्रिका आज (शुक्रवार) सहाव्या वनडे सामन्यात समोरासमोर आले आहेत. सेंच्युरियनमध्ये खेळल्या जाणार्‍या सामन्यात टीम इंडियाने  नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मैदान भारतासाठी लकी आहे. भारताने येथे 5 सामने जिंकले आहेत. जे दक्षिण आफ्रिकेच्या एका मैदानावरील सर्वाधिक विजय आहेत.

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मालिका जिंकल्यानंतर सहाव्या वनडेत भारताला आणखी एका विक्रमाची संधी आहे. टीम इंडिया 4-1 ने आघाडीवर आहे. आता टीमकडे द.आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच धर्तीवर एका मालिकेत 5 वनडे जिंकण्याची संधी आहे. भारताने द्विपक्षीय मालिकेत श्रीलंका व झिम्बाब्वे वगळता कोणत्याही देशात त्यांना त्यांच्याच धर्तीवर 5 वेळा हरवू शकला नाही.

 

टीम इंडियाचा राखीवला संधी
विराट कोहलीने मंगळवारी सहाव्या वनडेत बेंचवरील खेळाडूला संधी देण्याचे संकेत दिले होते. मालिकेत संधी न मिळालेल्या मनीष पांडे, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुरला मैदानात दिसू शकतात.

 

द. आफ्रिकेच्या एका मैदानावर सर्वाधिक
यजमान गोलंदाज वनडे मालिकेत अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांत ९ गोलंदाज आजमावले. या सर्वांनी मिळून केवळ 21 विकेट घेतल्या. भारताचे दोन फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी शानदार प्रदर्शन करत एकूण 30 विकेट मिळवल्या.

 

अव्वल तीन फलंदाजांत यजमान नाही
मालिकेतील अव्वल 3 फलंदाजांमध्ये कोहली 429 धावा काढत अव्वल स्थानावर आहे. शिखर धवनने 305 व रोहित शर्माने 155 धावा केल्या. हाशिम अामलाने 144 धावा करत दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी फलंदाज ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...