आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL 11: पंजाबचा 13 धावांनी पराभव करून हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर; राशीदचे 3 बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - रशीद खानच्या (३/१९) धारदार गाेलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार विजय संपादन केला. हैदराबादने गुरुवारी अापल्या घरच्या मैदानावर अार. अश्विनच्या किंग्ज इलेव्हान पंजाबचा पराभव केला. हैदराबाद संघाने १३ धावांनी सामना जिंकला. संघाच्या विजयात संदीप शर्मा, बासील थाम्पी अाणि शाकीब अल हसनने धारदार गाेलंदाजी करताना प्रत्येकी दाेन विकेटचे माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे हैदराबाद संघाला लीगमध्ये पाचव्या विजयाची नाेंद करता अाली. पंजाबच्या संघाचा लीगमधील हा दुसरा पराभव ठरला.

 

मनीष पांडेच्या (५४) अर्धशतकाच्या बळावर हैदराबाद संघाने घरच्या मैदानावर पंजाबसमाेर विजयासाठी १३३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात किंंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा अवघ्या ११९ धावांत खुर्दा उडाला. पंजाबकडून सलामीच्या लाेकेश राहुलने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला.  कर्णधार अश्विनने ४ धावा काढल्या.

 

रशीदने घेतल्या ३ विकेट

हैदाबादाच्या विजयाचा हीराे रशीद खानने धारदार गाेलंदाजी करताना ३ विकेट घेतल्या. त्याने ४ षटकांत १९ धावा देताना हे यश संपादन केले. यासह त्याने पंजाबला झटपट राेखण्यात माेलाचे याेगदान दिले. 

 

सामनावीर अंकित   
पंजाबच्या  सामनावीर अंकित राजपूतने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने ४ षटकांत १४ धावा देत ५ बळी घेतले. यंदा लीगमधील डावातील सर्वाेत्तम गाेलंदाज ठरली. 


 

 

पुढील स्लाईडवर पहा धावफलक... 

 

बातम्या आणखी आहेत...