आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-SL वनडे मालिकेचा पहिला सामना उद्या, टीम इंडियाकडे नंबर एकचा संघ होण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि श्रीलंकेत तीन वनडे सामन्यांची मालिका रविवारपासून सुरू होत आहे. सिरीजचा पहिला सामना धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडिअमवर सकाळी 11:30 वाजता सुरू होणार आहे. ही सिरीज जिंकून भारताला नंबर एक होण्याची संधी आहे. तर दुसरीकडे, गेल्या 8 वर्षांत श्रीलंकेने भारतीय संघाला एकहादी भारतात पराभूत केलेले नाही. अशात कुठल्याही परिस्थितीत मॅच जिंकण्याचे लक्ष्य श्रीलंकेचे असणार आहे. 

 

नवीन कर्णधारांसह उतरणार दोन्ही संघ
- भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सिरीजमध्ये दोन्ही संघांचे कर्णधार नवीन आहेत. भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, श्रीलंकेची जबाबदारी थिसारा परेराकडे देण्यात आली आहे. 
- विराटला विश्रांती दिल्याने रोहित प्रथमच ही जबाबदारी स्वीकारत आहे. तर थिसाराने यापूर्वी 20-20 सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व यापूर्वीच केले आहे. 
- याचवर्षी श्रीलंकेचा कर्णधार बदलण्याची ही सातवी वेळ आहे. यापूर्वी याच वर्षी अॅन्जेलो मॅथ्यूज, दिनेश चांडीमल, थिरिमाने, उपुल थरंगा, कपूगेदरा आणि मलिंगा यांना संधी मिळाली होती. 

 

नंबर-1 होण्यासाठी व्हाइट वॉश आवश्यक
- भारतीय टीम आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सध्या नंबर-2 वर आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघाचे गुण 120-120 असे समान आहेत. तरीही काही पॉइंट्समुळे आफ्रिका पुढे गेला आहे. 
- टीम इंडियाने वनडे सिरीजमध्ये श्रीलंकेला तिन्ही सामन्यात पराभूत केल्यास भारताकडे 121 गुण होतील. पण, भारताने एकही सामना हारल्यास भारताचे गुण 119 होतील आणि सिरीज जिंकली तरी भारत दोन नंबरवरच राहणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असे आहेत भारत आणि श्रीलंकेचे खेळाडू...

बातम्या आणखी आहेत...