आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T20 चा नवा बादशहा! 23 दिवसांतच मोडला रोहित शर्माचा विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - गेल्यावेळी अंडर-19 वर्ल्ड कपचा हिरो ठरलेला ऋषभ पंत याने पुन्हा जगाला आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला आहे. सय्यद मुश्ताक अली झोनल टी-20 मॅचमध्ये फक्त 32 बॉलमध्ये त्याने शतक लावला आहे. ऋषभ हा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला ग्राउंडवर हिमाचल प्रदेश विरोधात खेळत होता. या शतकाच्या बळावर त्याच्या टीमने 145 धावांचे लक्ष्य 11.4 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केले. पंत डॉमेस्टिक आणि इंटरनॅशनल टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात झपाट्याने शतक ठोकणारा इंडियन क्रिकेटर ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावे होता. रोहित शर्माने श्रीलंका विरोधात खेळताना 35 बॉलमध्ये शतक ठोकले होते. 

 

वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पंत...
- वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पंतच्या पुढे फक्त वेस्ट इंडीझचा ख्रिस गेल आहे. गेलने 2013 च्या आयपीएलमध्ये रॉयल चैलेंजर्स बेंगलुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरोधात 30 बॉलमध्ये 100 धावा काढल्या होत्या.
- ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरलेल्या पंतने आपल्या इनिंगमध्ये 38 बॉलमध्ये 116 धावा काढल्या. यात त्याच्या 8 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. दुसरा ओपनर ठरलेला गौतम गंभीर 30 धावांवर नाबाज होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सर्वात वेगवान टी-20 सेंच्युरी लावणारे इतर क्रिकेटर्स...

बातम्या आणखी आहेत...