आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या मृत्यूवर क्रिकेटर्स सुद्धा शोकाकुल, गांगुलीला आठवली शेवटची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूवर चित्रपट सृष्टी आणि चाहत्यांसह क्रिकेट जगताला सुद्धा मोठा धक्का बसला आहे. दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरसह सौरभ गांगुलीने देखील श्रीदेवी यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. गांगुलीने लिहिले, 'श्रीदेवीजींच्या अचानक मृत्यूचे वृत्त ऐकूण मला धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वीच माझी त्यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली होती. मला तर यावर विश्वास बसत नाही.' श्रीदेवी आणि गांगुली दादागिरी या टीव्ही शोवर एकत्रित आले होते. त्यावेळी दोघांनी डान्स देखील केला होता. त्यावेळी ती आपला चित्रपट मॉमच्या प्रसिद्धीत व्यस्त होती. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगु आणि मल्ळलम भाषांमध्ये सुद्धा रिलीझ झाला. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर क्रिकेटर्सने दिलेल्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...