आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-11 चे शेड्युल जारी, 51 दिवसांची टूर्नामेंट, 9 शहरांत होतील 60 मॅच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल 2018 च्या सामन्यांचा शेड्युल जारी करण्यात आला आहे. यातील पहिला सामना 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. देशभरातील 9 मैदानांवर 60 सामन्यांची ही सिरीझ 51 दिवसांपर्यंत चालणार आहे. यावेळी चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स टीम टूर्नामेंट कमबॅक करत आहेत. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्यांच्यावर 2 वर्षांची बंदी लावण्यात आली होती. आयपीएल सीझन 10 मध्ये मुंबई इंडियन्सचे संघ चॅम्पियन ठरले होते. 
 
2 सामन्यांचे ठिकाण निश्चित नाही
आयपीएलचे 2 सामने कुठे होणार हे अजुनही निश्चित झाले नाही. त्यापैकी एक एलिमिनेटर मॅच 23 मे रोजी आणि दुसरा सामना क्वालिफायर-2 हा 25 मे रोजी खेळला जाणार आहे. फायनल सामना 27 मे रोजी मुंबईत खेळला जाईल. 
 
वेळात बदल नाही
सुरुवातीला काही वृत्त आले होते, की सामन्यांची सुरुवात संध्याकाळी 8 वाजता खेळला जाणारा सामना 7 वाजता होईल. पण, असे कुठलेही बदल झाले नाही. आधीसारखेच हे सामने देखील सायंकाळी 4 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता खेळले जातील. यंदा स्टार स्पोर्ट्सकडे प्रसारणाचे अधिकार आहेत. यापूर्वी सोनीकडे राइट्स होते. 
 
वानखेडे स्टेडिअम, मुंबई
 
मॅच, कधी आणि टीम...
1. 7 एप्रिल, मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपरकिंग्स
2. 14 एप्रिल, मुंबई इंडियन्स vs दिल्ली डेयरडेविल्स
3. 17 एप्रिल, मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
4. 24 एप्रिल, मुंबई इंडियन्स vs सनराइजर्स हैदराबाद
5. 6 मे, मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाइटराइडर्स
6. 13 मे, मुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स
7. 16 मे, मुंबई इंडियन्स vs किंग्स इलेवन पंजाब
8. 22 मे, क्वालिफायर-1
9. 27 मे, फायनल
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, संपूर्ण शेड्युल, कुठे, कधी आणि कोणती मॅच...
बातम्या आणखी आहेत...