आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच हारूनही विजेता ठरला विराट, अझरुद्दीनसह गेलला टाकले मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा पराभव झाला तरीही कॅप्टन विराट कोहली चमकला आहे. आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा विराट मॅच हारूनही विजेता ठरला आहे. तो वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा 5 भारतीय क्रिकेटर ठरला आहे. तसेच जागतिक क्रमवारीत 16 व्या नंबरवर पोहोचला आहे. त्याने मोहम्मद अझरुद्दीन आणि क्रिस गेल या दोघांनाही पिछाडीवर टाकले आहे. 

 

- दक्षिण आफ्रिका विरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या विराटने 83 बॉलमध्ये 75 धावा काढल्या आहेत. 
- मॅचमध्ये 46 वा रन काढताना त्याने मोहम्मद अझरुद्दीनचा (308 इनिंग्समध्ये 9378 धावा) विक्रम मोडीस काढला आहे. आता तो वनडेमध्ये सर्वाधिक धावा काढणारा 5 भारतीय बनला आहे. 
- चौथ्या वनडे सामन्यानंतर विराटच्या 206 सामन्यांत 198 इनिंग्समध्ये 9423 धावा पूर्ण झाल्या आहेत. 
- वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा भारतीय होण्यासाठी विराटपुढे आता महेंद्र सिंह धोनी, राहुल द्रविड, सौरभ गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर 4 भारतीयांचे रेकॉर्ड आणि आकडेवारी...

बातम्या आणखी आहेत...