आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या तक्रारीनंतर शमीवर गुन्हा नोंद, आरोप सिद्ध झाल्यास करिअरचा THE END

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पत्नी हसीनच्या तक्रारीवरून टीम इंडियाचा द्रुतगती गोलंदाज मोहम्मद शमी व त्याच्या कुटुंबातील ४ सदस्यांविरुद्ध जादवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात शमी याची आई, बहीण, भाऊ व  भावजयीचा समावेश आहे. शमीवर हत्येचा प्रयत्न आणि त्याच्या भावावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, छळवणूक आणि कौटुंबिक हिंसाचार, मारहाणीचे आरोपही शमीच्या पत्नीने कुटुंबातील सदस्यांवर केले होते.

 

- विवाहबाह्य संबंधांचे आरोप लागल्यानंतर शमी आणि पत्नी हसीन जहा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शमीने आपल्या पत्नीवर दिवाळखोर झाल्याचा आरोप लावला. तर त्याच्या पत्नीने माध्यमांशी संवाद साधताना आता मॅच फिक्सिंगचा देखील आरोप केला. 
- कथितरीत्या पाकिस्तानी तरुणींसोबत अफेअर ठेवणारा शमी पाकिस्तानकडून पैसे घेऊन देशद्रोह करू शकतो. तो मॅच फिक्सिंग देखील करू शकतो असे गंभीर आरोप त्याच्या पत्नीने लावले आहेत.
- एवढेच नव्हे, तर याही पुढे जात शमीने पाकिस्तान आणि इंग्लंडच्या उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून मॅच फिक्सिंगसाठी लाच घेतली असा थेट आरोप तिने लावला. 
- शमीने सांगितल्याप्रमाणे, इतके गंभीर आरोप लावल्यानंतरही तो सातत्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थ म्हणून तिच्या वडिलांनी देखील घेतले. पण, ती काही समोर येण्यास तयार नाही. तिच्या आरोपांत तथ्य असेल तर तिने माझ्यासमोर यावे असे शमी म्हणाला. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच हसीन जहा हिने सोशल मीडियावर आपला पती शमीचे दुसऱ्या तरुणींशी संबंध असल्याचे आरोप लावले. तसेच शमीच्या मोबाईल चॅटिंगचे स्क्रीनशॉट देखील पोस्ट केले.
- तेव्हापासूनच दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. आता मात्र, या प्रकरणात पत्नी हसीन जहाने एफआयआर दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...